cyber crime 1.jpg
cyber crime 1.jpg 
नाशिक

सावधान! केवायसी अपडेटच्या लिंकवर समोरून क्लिक करायला सांगितले...अन् तिथेच बसला शॉक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इगतपुरी : तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे, यासाठी 10 रुपये पाठवावे लागतील. त्यासाठी लिंक पाठवत आहे, असा मेसेज एकाला पाठविला. अन् त्यानंतर मग जे काही घडले ते धक्कादायक होते.

असा घडला प्रकार
नांदगाव सदो येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले रामा अंजनेय रेड्डी (वय 54, मूळ रा. तिरुपती, जि. चितौर, हल्ली रा. साईलीला बिल्डिंग, खालची पेठ, इगतपुरी) यांच्या मोबाईलवर मंगळवारी (ता. 23) सायंकाळी साडेसहाला केवायसी अपडेटसाठी मेसेज आला. त्यात आपले केवायसी अपडेट करण्यासाठी 10 रुपये लागतील, असे म्हटले होते. रेड्डी यांनी संदेशातील मोबाईलवर बुधवारी संपर्क साधला असता, संदेश पाठविणाऱ्याने रेड्डी यांचा बॅंक पासबुक क्रमांक व क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक विचारून घेतला. नंतर त्या भामट्याने रेड्डी यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या खात्यातून 96 हजार 235 रुपये तीन वेळा काढले, तर स्टेट बॅंकेच्या खात्यातून 97 हजार 248 व 25 हजार 221 रुपये काढले. असे एकूण चार लाख 11 हजार 174 रुपये काढून घेतले. 

"तुमची फसवणूक झाली आहे
याबाबत रेड्डी यांनी आपल्या खात्यातून रक्कम कमी होत आहे, असे संबंधित व्यक्तीला सांगितले. पुन्हा रक्कम खात्यात जमा होईल, असे भामट्याने सांगितले. मात्र, प्रक्रिया पूर्ण होताच "तुमची फसवणूक झाली आहे. तुम्हाला काय करायचे ते करा,' असे रेड्डी यांना भामट्याने सांगितले. याबाबत श्री. रेड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलिस ठाण्यात सायबर गुन्हा भादंवि कलम 420, 419 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

सुमारे चार लाख परस्पर काढले

केवायसी अपडेट करायचे आहे, यासाठी 10 रुपये पाठवावे लागतील. त्यासाठी लिंक पाठवत आहे, असा मेसेज एकाला पाठविला. मेसेजवर क्‍लिक करायला लावून सुमारे चार लाख 11 हजार 174 रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना बुधवारी (ता. 24) घडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार - रिपोर्ट

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT