Unemployed Youth Survey esakal
नाशिक

Unemployed Youth Survey : बेरोजगार युवकांचे होणार सर्वेक्षण; राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्यमातून प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Unemployed Youth Survey : औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नसलेल्‍या युवकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नवी दिल्‍लीतील युवा व खेल मंत्रालय कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचनालय यांच्‍या समन्‍वयातून हे सर्वेक्षण पार पडणार आहे.

सर्वेक्षणासाठी प्रथम राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांची कार्यशाळा घेतली जात आहे. यानंतर एनएसएस स्‍वयंसेवकांच्‍या माध्यमातून सर्वेक्षण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (Unemployed Youth Survey will conducted Process through National Service Scheme nashik news)

शिक्षण व नियमित नियुक्‍ती नसलेल्‍या युवकांचे सर्वेक्षण केले जाते आहे. सर्वेक्षण प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश असणार आहे. या पार्श्वभूमीवर युवकांच्‍या सर्वेक्षणाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सूचनापत्र जारी केलेले आहे.

राष्ट्रीय सेवा योजना संलग्‍नीत महाविद्यालयातील स्‍वयंसेवकांच्‍या माध्यमातून दत्तक गावांमध्ये नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर उपक्रमांच्‍या दरम्‍यान हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांना क्षेत्रीय संचालक, यांच्‍यामार्फत सर्वेक्षण अर्जांचे वाटप केले जातील.

अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण झाल्‍यानंतर हे अर्ज एकत्रित स्वरूपात स्वीकारून पुन्‍हा ‘एनएसएस’ चे क्षेत्रीय संचालक कार्यालयात संकलित केले जाणार आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

उद्या नाशिकमध्ये कार्यशाळा

पुणे विद्यापीठातर्फे कार्यशाळांचे आयोजन केले आहे. त्‍यानुसार मविप्र संस्‍थेच्‍या सिडकोतील कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे, कला, विज्ञान, वाणिज्‍य महाविद्यालयात नाशिक जिल्ह्यासाठी कार्यशाळा होणार आहे.

गुरुवारी (ता.१३) सकाळी दहाला होत असलेल्‍या या कार्यशाळेतून सर्वेक्षणाची कार्यप्रणाली विशद केली जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी उपस्‍थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT