Death News esakal
नाशिक

Nashik News : उष्माघाताने अग्निवीर जवानाचा दुर्दैवी मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीराचे प्रशिक्षण घेणार्या जवानाचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (२१, मूळ रा. शिंदखेडा, जि. धुळे) असे मयत अग्निवीर जवानाचे नाव आहे. (Unfortunate death of firefighter due to heat stroke Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २१) पहाटेपासून आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी असलेल्या अग्निवीर जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. यादरम्यान, सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अग्निवीर जवान हर्षल ठाकरे याची प्रकृती बिघडली.

त्यास उलट्या झाल्या आणि तापही आला. त्यामुळे त्यास लान्सनायक नरेंद्र सिंग यांनी उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परंतु त्याचा दुपारी एक वाजेच्या सुमारास मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला.

जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्युचे निश्‍चित कारण स्पष्ट होऊ शकेल. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT