dr bharati pawar surrounded by farmers over onion issue esakal
नाशिक

Onion Crisis : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव

मुकुंद भडांगे

कोकणगाव (जि. नाशिक) : नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. (Union Minister dr bharati pawar surrounded by farmers over onion issue at kokangaon nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

रविवारी (दि. ५) निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मंत्री भारती पवार आल्या होत्या. त्यावेळी कांदा दरावरून त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन तात्या बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाफेड काहीच कामाचे नसल्याचे सांगताच केंद्रीय मंत्र्यांचा संताप अनावर झाला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू. या प्रश्नांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्मात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड; सलग दोन पराभव झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध आज सामना,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT