bharati pawar esakal
नाशिक

...अन् डॉ.भारती पवार सासूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या!

सकाळ डिजिटल टीम

मनमाड (जि. नाशिक) : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (bharti pawar), नारायण राणे, डॉ. भागवत कराड व कपिल पाटील या चार मंत्र्यांची जनतेशी संवाद साधण्यासाठी (ता. १६) ऑगस्टला जनआशीर्वाद यात्रेला (jan ashirwad yatra) सुरूवात झाली. डॉ. भारती पवार यांच्या यात्रेत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटरचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची पालघर येथून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा धुळ्याला समारोप झाला. या दरम्यान (ता.२१) त्यांनी कळवण येथे गेल्यावर डॉ.भारती पवार अचानक भावनिक झाल्या आणि सासूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागल्या. काय घडले नेमके?

भारती पवार यांची पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने मोठी चर्चा झाली होती. भारती पवार यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि त्यांना मंत्रिपद मिळाले. जनआशीर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर भारती पवार यांनी त्यांचे सासरे माजी मंत्री कै.ए.टी. पवार (a t pawar) यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि सासुच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनाही गहिवरून आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पालघरमधून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप धुळ्यात झाला. त्यानंतर त्यांनी कळवण तालुक्यातील दळवट येथे सासरे ए.टी. पवार यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं. सासऱ्याला अभिवादन करून श्रद्धांजली वाहताना डॉ.भारती पवार यांना ऱडू कोसळलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT