Minister Health MP Dr. Bharti Pawar 
नाशिक

उद्योग, व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: डॉ. भारती पवार

सतीश निकुंभ

उद्योजक व व्यापाऱ्यांनी डॉ. भारती पवार यांच्याशी संवाद साधत नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली.

सातपूर (नाशिक): केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकतीच नाशिकमधील उद्योजक व व्यापाऱ्यांशी संवाद साधत उद्योजक व व्यापारी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. उद्योजक व व्यापाऱ्यांनी डॉ. भारती पवार यांच्याशी संवाद साधत नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली.

या वेळी उपस्थित उद्योजक व व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरून दर्जेदार उत्पादनाची माहिती देता येईल. जीएसटी व इन्कम टॅक्सबाबत असलेल्या अडचणीचे समाधान करण्याचे आश्वासन या वेळी डॉ. भारती पवार यांनी दिले. मोठे उद्योग नाशिकमध्ये आल्यास नक्कीच अनेक लघु उद्योजकांच्या व्यवसायाच्या संधीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच येणारे इंडस्ट्रिअल बिलामध्ये उद्योजक व व्यापारी वर्गाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्दे समाविष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामगार कायदा हा उद्योजकांबरोबरच कामगारांच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने सोयीचा करता येईल, याबाबत नक्कीच संबंधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे असलेल्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी व या योजनांचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. याचबरोबर नाशिककरांसाठी एअर कनेक्टिव्हिटी जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व उद्योजक व व्यापाऱ्यांची एक समन्वय समिती स्थापून नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने तिमाही सर्वांसमवेत चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या वेळी माजी पर्यटनमंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार रावल, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आशिष नहार, प्रदीप पेशकर, लक्ष्मण सावजी, उद्योजक धनंजय बेळे, सतीश कोठारी, राजेंद्र आहिरे, सोनल दगडे, रत्नाकर शेट्टी, प्रफुल्ल संचेती आदी उद्योजक व व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT