Mobile & TV Ban esakal
नाशिक

Nashik News: अबब! वटार ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव; यावेळेत टीव्ही अन् मोबाईल वापरावर बंदी

सकाळ वृत्तसेवा

वटार (जि. नाशिक) : येथील ग्रामपंचायतीने ठराव करून गावात घरोघरी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोबाईल व टीव्ही वापरावर बंदी घातली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला पाचशे रुपये दंड देखील आकारण्याची तरतूद करण्यात आली असून अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ व पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. (Unique Resolution of Vatar Gram Panchayat Ban on mobile and TV use in 6 to 8 Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

माजी सैनिक व सरपंच मच्छिंद्र खैरनार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले असून त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. वटार ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या विशेष ग्रामसभेत गावातील घरोघरी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोबाईल व टीव्हीचा वापर न करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

सोबतच दररोज पहाटेदेखील याच पद्धतीने अंमलबजावणी करून पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घेण्याचे ठरविण्यात आले. यासाठी वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्य व सेवाभावी युवकांची शहानिशा करण्यासाठी नेमणूक देखील करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT