mns.jpg 
नाशिक

फेसबुक लाईव्हद्वारे रस्ता चकाचक?...'हा' तर मनसे'चा आऊट ऑफ बॉक्‍स फंडा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : आजच्या सोशल मिडीयाच्या युगात राजकारणातही युवा पिढीकडून "आऊट ऑफ बॉक्‍स' विचारसरणी प्रचलीत झाली आहे. "मनसे'ची आंदोलने त्यासाठी नेहेमीच चर्चेत असतात. नाशिक रोड भागातील वर्दळीचा अस्वच्छ रस्ता वारंवार पाठपुरावा करुनही स्वच्छ होत नव्हता. "मनसे'चे रोहन देशपांडे यांनी या रस्त्याचे थेट फेसबुक लाईव्ह केल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अवघ्या काही तासांत तो रस्ता चकाचक केला. 

अधिकाऱ्यांच्या भरभक्कम पगारासाठी कर भरणा नव्हे

काल नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहाजवळ कचऱ्याचे ढीग साठल्याचे निदर्शनाला आले. परिसरातील महाराष्ट्र सैनिक रोहन देशपांडे यांनी सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. अक्षरशः कचराकुंडी झालेल्या रस्त्याचा व्हिडीओ करून फेसबुक लाईव्हद्वारे शेअर केला. त्यात त्यांनी महापालिका आयुक्तांना तासात या प्रकाराची दखल घेण्याचे आवाहन केले. नागरिक कर भरतात तो अधिकाऱ्यांच्या भरभक्कम पगारासाठी नव्हे तर महापालिकेने योग्य सेवासुविधा नियमितपणे पुरवाव्या यासाठीच . मात्र प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्वरित स्वच्छता झाली नाही तर आयुक्त कार्यालयात येऊन कचरा भेट दिला जाईल असा इशाराही देशपांडे यांनी दिला. या व्हिडीओमुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्वरित चक्रे फिरली. नाशिकरोड विभाग स्वच्छता निरीक्षक विजय मोरे यांनी घटनास्थळी दाखल होत कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर साफसफाई करून घेतली. या तत्परबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रोहन देशपांडे यांनी महापालिकेचे व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

फेसबुक लाईव्हद्वारे समस्येला फोडली वाचा 

येथील शाहूनगरमधील ताराराणी सभागृहाजवळ रस्त्याच्या सुरुवातीला कचऱ्याचा ढीग पसरला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते रोहन देशपांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे या समस्येला वाचा फोडली. परिणामी समाजमाध्यमाच्या ताकदीमुळे त्वरित स्वच्छता होऊन परिसराने मोकळा श्वास घेतला. रस्ता चकाचक झाला. या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु नेहमीच कचऱ्याचा ढिग असल्याने नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत होते. महापालिकेला स्वच्छ शहर सर्वेक्षणात नुकताच चौथा क्रमांक मिळाला. त्याबद्दल आपली पाठही थोपटून घेण्यात आली. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. प्रत्यक्षात शहरातील विविध भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर कचरा साठलेला असतो. मोकाट गुरे तेथील कचरा सर्वत्र पसरवतात. दुर्गंधी पसरते. साथीचे रोग पसरण्याची भीती असते. मनपाच्या स्वच्छता विभागाचे मात्र, याकडे सोईस्कर दुर्लक्ष होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT