crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांचे विनापरवाना उत्पादन अन् विक्री; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात फळ व भाजीपाला पिकाखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून ग्लायफोसेट ४१ टक्के या तणनाशकाचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. शेतात तणनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या तणनाशकाची विनापरवाना उत्पादन व विक्री केल्याचे पाहणी दरम्यान जिल्हा भरारी पथकाला आढळून आले होते.

त्यानुसार गुजरात राज्यातील राजकोट येथील गुजरातमधील ग्रीन ॲग्रो बायोटेक व आर्या क्रॉप सायन्स या दोन कंपन्यांविरोधात पोलिस पंचवटी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Unlicensed production and sale of second rate pesticides case Filed Nashik Crime News)

शेतात ग्लायफोसेट ४१ टक्के प्रमाणात तणनाशकांचा उपयोग केला जातो. जिल्हा भरारी पथकामार्फत कीटकनाशके विक्री केंद्राची नियमित तपासणी करताना नाशिक शहरातील पंचवटीत जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, पंचायत समिती कृषी अधिकारी विजय चौधरी यांना एका कीटकनाशक विक्रेत्याकडे संबंधित कंपनीचे ‘ग्लायग्रीन’ नामक तणनाशक विक्रीला ठेवल्याचे आढळून आले होते.

या तणनाशकाबाबत विक्रेत्याकडे कंपनीचे उगम प्रमाणपत्र तसेच परवान्याविषयी माहिती नसल्याने तसेच गुणवत्तेबाबत संशय आल्याने कीटकनाशक साठा, विक्री बंद आदेश देऊन भरारी पथकाने नमुने घेतले होते.

पथकाने हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावरून ग्रीन ॲग्रो बायोटेक कंपनीने विपणन केलेल्या नमुना मोठ्या फरकाने प्रमाणित असल्याचे आढळून आले होते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

तसेच पुढील तपासात कंपनीकडे राज्यात कीटकनाशक विक्रीचा परवाना नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे प्रमाणित कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला. तसेच पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे आदेश व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, माजी कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी संबंधित कंपनी विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात (नाशिक) कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशक नियम १९७१, भादवी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

Cyber Fraud : एमएनजीएलच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा वाढता धोका; ग्राहकांची कोंडी, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह!

SCROLL FOR NEXT