unseasonal rain damaged crops esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage : गारपिटीमध्ये 50 कोटींचा फटका; 2 दिवसांत रब्बीच्या पिकांची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Damage : अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीने दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यांसह बागलाणमधील मोसम खोऱ्यात शेतीची दाणादाण उडवली आहे. यंदाच्या हंगामात अंतिम टप्प्यात पोचलेल्या द्राक्षबागांसह कांदा, गहू, टरबूज, भाजीपाला, हरभऱ्याचे नुकसान पन्नास कोटींच्या पुढे पोचल्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांचे आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता.१६) आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. ते परतत नाहीत तोच सायंकाळी पाऊस आणि गारांनी दणका उडवून दिला. (Unseasonal Rain Damage 50 crore hit in hailstorm destroyed rabi crops in 2 days nashik news)

मोहाडीच्या (ता. दिंडोरी) उत्तर भागात रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी द्राक्षबागांमधून वाहत होते. शनिवारी (ता. १५) झालेल्या गारपिटीतून वाचलेली द्राक्षे बेदाण्यासाठी देण्याचा विचार शेतकरी करत होते.

अशा बागांना या पावसाने फटका बसला. त्याचबरोबर शेतातील कांदाही भिजला. दरम्यान, राज्यात पाच लाख ४५ हजार हेक्टरवर उन्हाळी तथा रब्बी कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

त्यातील वीस टक्क्यांपर्यंत म्हणजेच, एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा यापूर्वी अवकाळी पावसाने बाधित केला आहे. त्यात आजच्या आणि कालच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भर पडली आहे. साकोरे मिग (ता. निफाड) ते कुर्णोली, मोहाडी, जोपूळ, खडक सुकेणे, चिंचखेड (ता. दिंडोरी) अशा बारा गावांमधील साडेचारशे हेक्टरच्या आसपास द्राक्षबागांना अवकाळीसह गारपिटीने दणका दिल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अंतिम टप्प्यात असलेल्या पंधरा ते वीस टक्के बागांवर पावसाने ‘पाणी’ फिरवले आहे. हेक्टरी २५ टनाचे उत्पादन आणि सध्याचा भाव लक्षात घेता द्राक्षांचे हे नुकसान ३५ कोटींपर्यंत पोचले आहे. गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांचे मणी तडकून जमिनीवर पडल्याचे हृदयद्रावक दृश्‍य शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.

‘अर्ली’ उत्पादनासाठी बागांमध्ये केलेल्या खरड छाटणीनंतर कोवळ्या फुटी फुटण्यास सुरवात झाली. या फुटी गारांनी मोडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोसम खोऱ्यात शेतातील कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गारांमुळे टरबूज, भाजीपाल्याच्या नुकसानीचा आकडा वाढला आहे.

"निर्यातदारांनी खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे महिना, दीड महिना, दोन महिने या कालावधीत दिले जातात. मात्र आता गारांनी तोंडचे पाणी पळवले असल्याने निर्यातदारांनी द्राक्षांचे पैसे लवकर दिल्यास मदत होईल, अशी भावना शेतकऱ्यांची आहे. "

- कैलास भोसले (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT