A farmer showing a rotten grape esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage : गारपीट, अवकाळीने द्राक्ष सडण्यास सुरवात; शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना गत रविवारी सायंकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने त्याचे परिणाम आता शेती पिकांवर दिसण्यास सुरवात झाली आहे.

द्राक्ष बागेतील उभ्या पिकावरील द्राक्ष सडण्यास सुरवात झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली. (Unseasonal Rain Damage Hail unseasonal start of grape rot Farmers worried nashik news)

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर, सायखेडा चांदोरी, शिंगवे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, निफाड, उगाव, वनसगाव, सारोळे, खडक माळेगाव या गावांना सलग तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. टाकळी विंचूर येथील गोविंद टोपे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांने तीन एकरावर द्राक्षाची लागवड केली असून आठ ते नऊ लाख रुपये खर्च करून द्राक्षाचे पीक जोमदार घेतले होते.

व्यापाऱ्यांशी पन्नास रुपये दराने व्यवहार झाला. सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्याअगोदरच रविवारी सायंकाळी गारपीट अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

उभ्या द्राक्ष बागेवरील पिकांना तडे गेल्याने द्राक्ष सडण्यास सुरवात झाली आहे. द्राक्षांवर चाचण देखील बसत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा मोठा प्रश्न उभा राहिल्याचे श्री. टोपे चिंतेत आहे.

"अवकाळी पावसाने द्राक्ष सडण्यास सुरवात झाल्याने द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, पुढील पीक कसे घ्यावे यासह अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिल्याने संपूर्ण कर्जमाफी करत पुढील पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख मदत करावी."

-शिवम हांडोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT