Hailstorm caused damage to onions in the taluka on Sunday evening
Hailstorm caused damage to onions in the taluka on Sunday evening esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage : सिन्नर तालुक्यात 366 हेक्टरमध्ये नुकसान; रब्बीसह भाजीपाला पिकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Crop Damage : तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचे ग्रामस्तरीय समितीतर्फे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी दिले आहेत.

तहसीलदार बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय ग्रामस्तरीय समितीस पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Unseasonal Rain Damage in 366 hectares in Sinnar Taluka nashik news)

कृषी विभागाच्या पाहणीत प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील २० गावांमधील सुमारे ३६६ हेक्टरहून अधिक क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. या व्यतिरिक्तही ज्या गावांमध्ये नुकसान झाले असेल तेथील ग्रामस्तरीय समितीने नुकसानीचे पंचनामे करून एकत्रित अहवाल शासनास सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेशी संबंधित अभिलेख तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीकडे पाठवण्यात येतील. विमा न काढलेल्या मात्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे व गोषवारा तलाठ्यांमार्फत तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा, सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, कृषी अधिकारी महेश वेठेकर यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बोरखिंड, सरदवाडी, पांढुर्ली, मोह, पाटोळे, नायगाव, पास्ते, कणकोरी, आगासखिंड, जायगाव, माळेगाव, ब्राह्मणवाडे, मोहदरी, बेलू, चिंचोली, सोनगिरी, चंद्रपूर, वडझिरे, पिंपळे आटकवडे आदी गावांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

याव्यतिरिक्तही ज्या गावांतील शेतकरी यांचे नुकसान झाले आहे, तेथेही पंचनामे करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करताना शेतजमीन व पिकांचे सर्वे क्रमांक / गट क्रमांक दाखवणे, सातबारामध्ये नोंद नमूद केलेल्या क्षेत्राप्रमाणे आपदग्रस्त क्षेत्र जुळविण्याची जबाबदारी तलाठ्यांवर असणार आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे जीपीएस फोटो मोबाइलवर काढून ते शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम ग्रामसेवकास करावे लागणार आहे. नुकसानीची टक्केवारी ठरवण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यातील नुकसान

(एकूण ३६६ हेक्टर, अदाजे ६०० शेतकरी)

गावे : २०

गहू : १२ हेक्टर

कांदा : २७० हेक्टर

आंबा : ४ हेक्टर

टोमॅटो : ५० हेक्टर

भाजीपाला : ३० हेक्टर

एकूण : ३६६ हेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

SCROLL FOR NEXT