Officers, farmers with Suhas Kande while inspecting the damage caused by the hail at Jategaon.
Officers, farmers with Suhas Kande while inspecting the damage caused by the hail at Jategaon. esakal
नाशिक

Unseasonal Damage: नांदगावला शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत; घाटमाथ्यावर 1788 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Damage : नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव, बोलठाण, ढेकू, कुसुमतेल, रोहिले, गोंडेगाव, जवळीक, व वसंत नगर, चंदनपुरी, लोढरे इत्यादी ठिकाणी मागील महिन्यात झालेल्या अवकाळी, वादळीवारा व गारपिटीच्या पावसाने १ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रातील सुमारे ४ हजार ८४० शेतकरी बांधवांचे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.

त्यात प्रामुख्याने कांदा, मका तसेच इतर फळबाग या नगदी पिकांचे पूर्णतः नुकसान झाले त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णतः कोलमडून गेलेला आहे, घाटमाथ्यावरील तसेच तालुक्यातील अर्थकारण ठप्प झाले आहे.

या गारपीटनंतर आमदार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते यांनी तत्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. मात्र या घटनेला एक महिन्याचा अवधी उलटूनही अद्यापही मदत न मिळाल्याने येथील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. (Unseasonal rain Damage Nandgaon farmers await compensation Loss of 1788 hectare area on Ghat Matha nashik news)

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे घाटमाथावरील कांदा, मकासह अन्य शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या पुरता कोलमडून गेला होता. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर याठिकाणी आमदार सुहास कांदे, माजी आमदार पंकज भुजबळ, ॲड. अनिल आहेर यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देत प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार तहसीलदार सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पर्यवेक्षक , कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शासनास लगबगीने दहा दिवसांत २० एप्रिल रोजी अहवाल सादर केला.

त्यानुसार नांदगाव तालुक्यात १२ हजार ६१० शेतकऱ्यांचे ६ हजार ५१३ हेक्टर क्षेत्रातील उन्हाळ कांदा, मका, लाल कांदा, कांद्याचे बियाणे, गहु पिकांचे त्याचप्रमाणे रामफळ, आंबा, चिकू, केळी इत्यादी फळबाग पूर्णपणे उद्वस्त झाल्याचे सांगितले.

तर यापैकी घाटमाथ्यावर १ हजार ७८८ हेक्टर शेतीतील पिकांचे ३ कोटी ४ लाख रुपयांचे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासह जातेगाव येथील रहिवासी व सैन्य दलातील जवान शशिकांत खैरनार, गणेश खैरनार यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे उडाले होते. त्यांच्या शेतातील साठवून ठेवलेला सुमारे दहा क्विंटल कापूस आणि धान्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

कोकिळाबाई पाटील या महिला शेतकरी भगिनीचे देखील शेतातील शेडनेट वादळामुळे उडाल्याने दहा लाख रुपयांचे आणि त्यातील लागवड केलेला शिमला मिरची या पिकाचे दोन लाख रुपयांचे असे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सर्व घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्याने येथील शेतकरी शासनाच्या भरपाईकडे आस लाऊन बसला आहे. काही दिवसांत खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्याने येथील शेतकरी चिंतेत दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या चार विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT