Santupatil Zambare and office bearers of the Farmers Association while giving a statement to the Tehsildar Aba Mahajan on Friday demanding that the auction of farm land in Yewla should be stopped. esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage: पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज भरणार कसे? शेतकऱ्यांचा सवाल; शेतकरी संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Damage : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले असून यंदा निसर्गाने झालेले नुकसान व पडलेले भाव यामुळे शेतकरी अजूनच कर्जाच्या खाईत लोटला आहे. अशा स्थितीत जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करणे सुरू करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लिलाव रोखावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. (Unseasonal Rain Damage unable pay loan due to crop damage Aggressive farmers association at yeola nashik news)

शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता. १९) जिल्हा बँकेच्या विरोधात मोर्चा काढला. येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देऊन चर्चा केली. शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी घोषणा करते.

त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेने शेतजमिनीचे लिलाव काढले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतमालाचे मातीमोल भाव, अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सक्तीची वसूली, शेतजमिनीचे लिलाव, करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप शेतकरी संघटना नेते संतूपाटील झांबरे यांनी केला.

शेतजमिनीचे लिलाव रद्द करा अन्यथा शेतकरी संघटना थकबाकीदार शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी बॅंक प्रशासन आणि शासनाची असेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रसंगी थकबाकीदार शेतकरी यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते संतूपाटील झांबरे, बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, सुरेश जेजूरकर, वसंत झांबरे, भानुदास चव्हाण, राजेंद्र जाधव, नवनाथ सोमासे, भीमराज आवारे, भाऊसाहेब सोमासे, दिलीप गांजे, बापू कोकाटे, भाऊसाहेब आवारे, दत्तात्रय चव्हाण, दिलीप चव्हाण, राहुल सोमासे, विजय चव्हाण, यशवंत सोमासे, भाऊसाहेब आहेर, गणेश आवारे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

खरिपाचे पीक उभे कसे करायचे या विवंचनेत शेतकरी असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतजमिनीचे लिलाव काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम केले असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

शेतकरी पीक कर्ज घेऊन शेतमाल उत्पादन करतो मात्र त्याच्या शेतमालाला शासनाच्या आयात, निर्यात धोरणाचा फटका बसल्याने आणि अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने सरकारने कर्ज भरून शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे अशी मागणी शेतकरी संघटनेने या निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT