rain damage crops esakal
नाशिक

कोयता थांबला, हंगाम लांबला; अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण

सचिन गुरव

सिद्धटेक (जि. अहमदनगर) : कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मोसम सापडलेला ऊसतोडणी हंगाम त्यामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. दिवाळीनंतर धारदारपणे सुरू झालेला कोयता अवकाळीमुळे थांबला. ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यांवरील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

गाळप हंगामाला ब्रेक

भीमाकाठावरील आडसाली उसाची तोडणी पूर्णपणे थांबल्याने व शेते वाफसा स्थितीत येण्यास वेळ लागणार असल्याने, गळीत हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानानंतर भीमा नदीपट्ट्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जोमाने सुरू झालेल्या गाळप हंगामाला ब्रेक लागला आहे. शिवाय, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. ऊसवाहतूक करणारी अनेक वाहने शेतातच अडकून पडली आहेत.

रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान

वाहतुकीसाठी तोडलेला ऊस शेतात तसाच पडून आहे. अनेक ठिकाणी सऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे इतर भाजीपाला पिके, कांदा, तसेच फूलउत्पादकांसमोर रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. दरम्यान, रिमझिम पाऊस व दाट धुक्यामुळे कांदा व इतर नगदी पिकांवर बुरशी, करप्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

''अवकाळी पावसाचा परिणाम गाळप हंगामावर नक्कीच होणार आहे. सध्या आडसाली उसाची तोडणी सुरू असून, पावसामुळे ती पूर्णपणे थांबली आहे. पावसाच्या उघडिपीनंतर दोन ते तीन दिवसांत तोडणी पुन्हा सुरू होईल.'' - सुरेश तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अंबालिका शुगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT