Damage to vineyards due to untimely rains. esakal
नाशिक

Unseasonal Rain: द्राक्षबागांसह कांदा, गहू पिके भुईसपाट; दिंडोरी तालुक्यात सरसकट पंचनामे करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : गत दोन दिवसापासून दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह गारांसहित हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, व भाजीपाला, या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

काढणीला आलेल्या द्राक्षबागा व गहू या पावसाने भुईसपाट केल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain Onion wheat crops fallow with vineyards Demand for panchnama in Dindori taluka nashik news)

पालकमंत्री दादा भुसे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार अनिल कदम, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी गटनेते मविप्रचे तालुका संचालक- प्रवीण जाधव, प्रांताधिकारी नीलेश अपार, तहसीलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी श्रीमती जगताप,

कृषी अधिकारी विजय पाटील आदींनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कृषिअधिकारी तलाठी यांनी पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. मात्र पंचनामे होत आहे परंतु, मदत केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर विविध कारणांनी वेगवेगळ्या आपत्तींचे संकट उभे राहत आहे. या संकटांना सामोरे जाऊन पुन्हा ताट मानेने शेतकरी उभा राहतो आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला.

त्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच शेतकऱ्यांच्या द्राक्षांना भाव नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला. गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष शेती भावा अभावी संकटात सापडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागांवर कुऱ्हाडी चालवल्या, तर यंदा तीस टक्के द्राक्ष बागा तोडल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाची अवकृपा झाल्यामुळे शेतकरी शेतीपिकांप्रमाणेच भुईसपाट होत चालला आहे. पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेल्या या द्राक्षबागांचे होत्याचे नव्हते झाले. कांद्याचे ही तेच झाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

याशिवाय इतरही शेतीपिकांना बाजार भाव नाही आणि त्यातच अवकाळी पावसाचा तडाका बसल्याने हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

आर्थिक गणित बिघडले

द्राक्ष पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात मात्र येणारी ही मदत तुटपुंजी हजारो रुपयांमध्ये मिळते, त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असल्याने बँक, सोसायटी, सावकारी कर्ज, हात उसनवार, हे फेडणार कसे असा प्रश्नही आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले जरी असले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT