Untimely hit 636 hectares in Nashik district Demand the Government 
नाशिक

नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा ६३६ हेक्टरला दणका

मदतीपोटी ९९ लाखांची शासनाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साधारण ६३६ हेक्टरवरील पिकांना दणका बसला आहे. त्यापोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९९ लाख १५ हजारांची मदत मागितली आहे.

फळपीक सोडून बागायती पिकाखालील ४६.१४ हेक्टरला अवकाळी पावसाचा दणका बसला आहे. त्यात सात तालुक्यांतील २४१.६३ हेक्टर (कांदा), ६४.८० हेक्टर (गहू), १.७५ हेक्टर (मका), ०.२० (हरभरा), २.०४ हेक्टर (ऊस), ०.६७ हेक्टर (ज्वारी चारा पीक), ३०.१३ हेक्टरवरील भाजीपाला, तर ०.५७ हेक्टरवरील पपई याप्रमाणे ३४१.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. फळपीक सोडून बागायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे निधीची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

२९५ हेक्टरवर द्राक्षाला फटका

बहुवार्षिक फळपिकाखालील सर्वाधिक २९४.५१ हेक्टरवरील द्राक्षपिकाचे नुकसान झाले. फळपिकांच्या नुकसानीपोटी १८ हजार रुपये हेक्टरप्रमाणे मदत दिली जाते. जिल्ह्यात ५३ हेक्टरहून अधिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात पेरू (०.२५ हेक्टर), आंबा (३.१० हेक्टर), द्राक्षे (२९४.५१), डाळिंब (४.६०) यां पिकांचा समावेश आहे. साधारण ५३ लाखांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT