Nashik city Rain record  
नाशिक

अवकाळीचा पुन्हा दणका; नाशिक शहरात १०.८ मि.मी. पावसाची नोंद

पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह सुरु असलेल्या पावसाने चांदवड तालुक्यात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर- जिल्ह्यात कालपासून बेमोसमी पावसाचा कहर सुरु झाला आहे. बुधवारी पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह सुरु असलेल्या पावसाने चांदवड तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. नाशिक शहरात १०.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची आता कुठे मदत मिळाली अन् दुसऱ्याच दिवशी पुन्हा अवकाळीने दणका दिला.

शहर- जिल्ह्यात बुधवारी (ता.९) पहाटे साडेतीन पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. वाकी (ता.चांदवड) भागात पहाटे सहाच्या सुमारास वीज पडून कैलास सूर्यभान कवडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पश्चिम पट्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी, नाशिक तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. बुधवारी पहाटेपासून दिवसभरात दोनदा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाला. पावसाने गव्हासह द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान केले.

शेतीपिकांचे नुकसान

सटाणा, दिंडोरी, चांदवड, देवळा, निफाड आदी तालुक्यात शेतीपिकांना मोठा दणका बसला. गहू, द्राक्ष, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता.८) अवकाळीत गाईसह तीन बैलांचा मृत्यू झाला. पेठ १.२०, निफाड १.६०, सिन्नर २, मालेगाव १, चांदवड १, कळवण १, सुरगाणा २.३०, बागलाण १, देवळा १७.२० पाऊस झाला. आज सलग दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनला, सकाळी साडेआठला व त्यानंतर पुन्हा पावणेअकराच्या सुमारास शहर- जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या.

मदत अन्‌ फटका

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे जिल्ह्याला ३२ कोटी २९ लाखांची नुकसान भरपाईची मदत मिळाली. अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे जमा झालेले नाही. तोच, आज अवकाळी पावसाने जिल्ह्याला पुन्हा दणका दिला. येवला (१५ कोटी २४ लाख), नांदगाव (१५ कोटी ७४ लाख), देवळा (८३ हजार), सुरगाणा (४ लाख ५६ हजार), त्र्यंबकेश्वर (९५ हजार), इगतपुरी (३ लाख १७ हजार), पेठ (३ लाख ७१ हजार) निफाड (१ कोटी १७ लाख) याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT