untimely rains Bulls die after being struck by lightning sakal
नाशिक

नाशिक : अवकाळीचा दणका; वळवाडेत वीज पडून बैल मृत्युमुखी

झोडगे परिसरात शेवग्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

जायखेडा/साल्हेर : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता. ७) सायंकाळच्या सुमारास बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जायखेडा परिसरात सहाच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा, आंबा, मिरची, टोमॅटो, वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वळवाडे शिवारात वीज पडून बैल ठार झाला.

हवामान खात्याने ७, ८, ९ या तारखेला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन झालेल्या बेमोसमी पावसाने हजेरी लावत आर्थिक नुकसान झाले. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बहरलेल्या गावरान आंब्यांनाही या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. आंब्यांच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे.

वळवाडेत वीज पडून बैल ठार

अंबासन : येथील वळवाडे शिवारातील शेतकरी त्र्यंबक कोंडाजी कोर यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर रात्री आठच्या सुमारास वीज कोसळून बैल ठार झाला. गाव व परिसरात सायंकाळपासून विजांचा कडकडाट होता. यामुळे काही वेळ महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बेमोसमी पावसाने कांदा, गहु, हरभरा, आंबा मोहोरावर परिणाम होणार आहे. मालेगावचे तहसीलदार चंद्रसिंग राजपूत यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

झोडगे परिसरात शेवग्याचे नुकसान

झोडगे : माळमाथा परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने काढणीसाठी आलेल्या कांद्यासह गहू, हरभरा व शेवगा पिकांना फटका बसला. अचानक पावसाला सुरवात झाल्याने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता आहे.

साल्हेरला तुरळक सरी

बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी भागात काही ठिकाणी तुरळक बेमोसमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. साल्हेरला शेतामध्ये काढून ठेवलेला वाटाणा, मसूर, हरभरा आदी पिके काढण्याचे काम या भागात सुरू आहे. नागली, भात, गुरांचा, चारा या बेमोसमी पावसाने भिजला. आंबा मोहराचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT