blood bank inflation blood price increased 100 to 350 rs health mumbai
blood bank inflation blood price increased 100 to 350 rs health mumbai esakal
नाशिक

Sakal Exclusive: नाशिकमध्ये रक्‍ताचा 30 टक्क्‍यांपर्यंत तुटवडा; दिवाळीच्‍या सुट्यांचे परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive: शस्त्रक्रिया किंवा अन्‍य विविध कारणांसाठी रक्‍तपिशव्‍यांची आवश्‍यकता भासत असते. सध्या मागणीच्‍या तुलनेत रक्‍ताचा पुरवठा कमी होत आहे. दिवाळीच्‍या सुट्यांमुळे शिबिरांची संख्या घटली असल्‍याने सुमारे ३० टक्क्‍यांपर्यंत तुटवडा जाणवत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. डिसेंबरमध्ये पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज वर्तविला जातो.

शहरात १२ वर रक्‍तपेढ्या कार्यरत असून, यापैकी शासकीय रक्‍तपेढी व इतर मोठ्या रक्‍तपेढ्यांकडे मागणीच्‍या तुलनेत समाधानकारक रक्‍तपुरवठा आहे. (Up to 30 percent shortage of blood in Nashik news)

मात्र, काही रक्‍तपेढ्यांकडे दैनंदिन गरजेच्‍या तुलनेत उपलब्‍ध रक्‍तपिशव्‍यांचे प्रमाण कमी असल्‍याने मागणीची पूर्तता करताना दमछाक होते.

गेल्‍या काही दिवसांपासून दिवाळीच्‍या सुट्या असल्‍याने महाविद्यालयांमध्ये शिबिरे बंद आहेत. कंपन्‍यांनाही दिवाळीनिमित्त सुट्या असल्‍याने अनेक नागरिक पर्यटनाचा आनंद घेण्यात व्‍यस्त असल्‍याने शिबिरांची संख्या घटली. यामुळे संकलित होणाऱ्या रक्‍ताचे प्रमाणही कमी झाले. परिणामी, मागणीइतका पुरवठा करणे सध्या आव्‍हानात्‍मक बनले आहे.

भाविकांची मिळतेय साद...

सध्या पाथर्डी गाव परिसरात शिवमहापुराण सत्‍संग सोहळा सुरू आहे. या ठिकाणी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयातील रक्‍तपेढीमार्फत शिबिरांचे आयोजन केले जाते. त्‍यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तुटवड्याचे प्रमाण कमी करण्यास सहाय्य होत आहे.

अशी आहे मागणी पुरवठ्याची स्‍थिती

शहरात दैनंदिन सरासरी १२५ ते १५० रक्‍तपिशव्‍यांची मागणी होते. सामान्‍य स्‍थितीत ही पूर्तता होऊन अतिरिक्‍त रक्‍तपिशव्‍या असतात; परंतु सध्या साधारणतः १०० ते १२० पिशव्‍या उपलब्‍ध होत असून, उर्वरित २५ ते ३० पिशव्‍यांचा तुटवडा रोजच जाणवत आहे. अशा परिस्‍थितीत रुग्‍णांच्‍या वैद्यकीय स्‍थितीनुसार अत्‍यवस्‍थ रुग्‍णांना प्राधान्‍यक्रमाने रक्‍तपुरवठा केला जातो.

"दिवाळीच्‍या सुट्यांमध्ये महाविद्यालये व कंपन्‍यांतील शिबिरांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. परिणामी, रक्‍तपुरवठाही घटला. डिसेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यापर्यंत रक्‍तपुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे." - डॉ. नंदकिशोर तातेड, अर्पण ब्‍लड बँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT