Matka and gambling going on in Indraprastha Colony area esakal
नाशिक

Nashik Crime: उपनगरला खुलेआम मटक्याचा अड्डा सुरू! पोलिसांचे दुर्लक्ष; स्थानिकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : उपनगर भागातील इंद्रप्रस्थ कॉलनीसमोर असलेल्या शौचालयालगत देवी मंदिरात खुलेआम मटक्याचा अड्डा सुरू असून, पोलिस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी आरोप केला आहे. (upanagar open matka adda police neglect Accused by locals Nashik Crime)

नाशिकमध्ये विविध ठिकाणी जुगार अड्डे सर्रास सुरू असल्याबाबतचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात विधिमंडळामध्ये उपस्थित झालेला असताना उपनगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीसमोरील शौचालयालगत देवी मंदिरात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजरोस बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सुरू असल्याची तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.

अंकुश शिंदे पोलिस आयुक्त असताना बंद असलेले अवैध धंदे नवनियुक्त आयुक्त आल्यापासून सर्रासपणे सुरु झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या जुगार अड्ड्यांवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मद्यपी जुगार खेळत असल्याने भाविकांना देवी मंदिरात जाणे तसेच युवती व महिलांना रस्त्याने चालणे मुश्कील बनले आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दिवसागणिक लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिवसाढवळ्या खुलेआम सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिस प्रशासनाने अजून कारवाई का केली नाही, असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व चालत असल्याचा निर्वाळा नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT