sadanand nawale and A letter from the Parishad on receiving the Adarsh ​​Sarpanch Award. 
नाशिक

Nashik News: उपसरपंचांना मिळाला ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार; सरपंच परिषद कार्यद्धतीवर लोकप्रतिनिधींकडून आश्चर्य

प्रमोद दंडगव्हाळ

Nashik News: उत्कृष्ट काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व लोकप्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या सरपंच परिषदेने उपसरपंचांची ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी निवड करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे (Upsarpanch received Adarsh ​​Sarpanch award nashik news)

प्रतिसक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र)तर्फे पंचायतराजला चांगली दिशा मिळण्यासाठी परिषदेतर्फे उत्कृष्ट काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व लोकप्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद राज्यात काम करीत आहे. त्यांचे हे दुसरे वर्ष आहे. सारूळचे उपसरपंच सदानंद बंडोपंत नवले यांचे काम लक्षात घेता सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने त्यांना ‘आदर्श सरपंच’ हा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत घेतला.

रविवारी (ता. ३) सकाळी साडेदहाला यशदा (पुणे) येथे या कार्यक्रमास उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारावा, असे रीतसर पत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिले आहे. यासंदर्भात काकडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की नाशिकमधून १० पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रस्ताव तपासूनच पुरस्कार देण्यात आले. श्री. नवले यांना विचारण्यात आले असता सरपंच म्हणून त्यांनी पुरस्कार देण्याचे सांगितले आहे.

पुरस्कारार्थींमध्ये खळबळ

वास्तविक पाहता पुरस्कार देणाऱ्या समूहाने संबंधित व्यक्तीची योग्य ती खातरजमा करून पुरस्कार देणे आवश्यक आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांचे राज्यात मोठे नाव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार देण्यात येतो.

त्यामुळे या पुरस्काराकडे मोठ्या आशेने सर्वजण पाहत असतात. त्यामुळे उपसरपंचांना सरपंच म्हणून आदर्श पुरस्कार देणे ही आश्चर्याची गोष्ट मानली जात आहे. तसेच, रीतसर पत्रही देण्यात आले. त्यामुळे पुरस्कारार्थींमध्ये खळबळ उडाली असून, परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT