नाशिक

शहराच्या विकासाला २२.८६ कोटींचे बळ

CD
टुडे पान २ मेन फिचर --- (महापालिकेच्या इमारतीचा फोटो वापरावा) --- शहराच्या विकासाला २२.८६ कोटींचे बळ रस्ते, नाट्यगृह अन् प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण; दिवाळीनंतर ‘निविदा’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील रखडलेल्या नागरी सुविधांना चालना देण्यासह विविध भागांतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी जळगाव महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या महासभेत तब्बल २२ कोटी ८६ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, गटारी, वाचनालय आणि सार्वजनिक सुविधांच्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचे प्रस्ताव महासभेत मांडण्यात आले होते. त्यांना मंजुरी मिळाल्याने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. दिवाळीनंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेला वेग देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंजूर निधीपैकी १० कोटी ७६ लाख रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी, दोन कोटी ४७ लाख रुपये दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेसाठी, तर नऊ कोटी ६२ लाख रुपये अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती महापौर दीपमाला काळे यांच्याकडून दिली आहे. ‘बालगंधर्व’चा विकास नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीतील सभागृहाचे नूतनीकरण, बालगंधर्व खुले नाट्यगृह व उद्यानाचा विकास, आकाशवाणी चौक आणि अजिंठा चौफुलीचे सुशोभीकरण, इच्छादेवी चौकाचा विकास, कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण आणि एकात्मिक नागरी निरीक्षण व नियंत्रण केंद्र उभारण्याचा समावेश आहे. तसेच कै. धनाजी नाना चौधरी यांचा पुतळा उभारण्याचेही नियोजन आहे. चौकटीत मंजूर निधी आणि महत्त्वाची विकासकामे - १०.७६ कोटी रुपये : नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रशासकीय सभागृह नूतनीकरण (३.५० कोटी), बालगंधर्व नाट्यगृह व उद्यान (२.५० कोटी), आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली विकास (२ कोटी). - २.४७ कोटी रुपये : मेहरुण स्मशानभूमी पूल ते शिवाजी महाराज स्मारक रस्ता काँक्रीटीकरण, इच्छादेवी चौक ते सुखअमृत अपार्टमेंट रस्ता व गटार, जोशीपेठ रस्त्यांचे डांबरीकरण. - ९.६२ कोटी रुपये : राजमालती नगर, बहिणाबाई नगर, शिवशंकर कॉलनी, काळे नगर, गुरुनानक नगर, खंडेराव नगर, समतानगर आदी भागांत रस्ते व गटारी. - विशेष कामे : ममुराबाद रोडवरील समाजमंदिर व वाचनालय, नवीन विपश्यना केंद्र, आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक व बैठक व्यवस्था, हुडको बौद्धनगरातील खुल्या जागेला संरक्षक भिंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT