फोटो - NSK26H34459
नाशिक : मुक्त विद्यापीठात ‘उर्दू शायरीचा परिचय’ विषयावर ऑनलाइन व्याख्यान देताना कवी उबैद आझम आझमी.
कविता तत्कालीन सामाजिक,
वैचारिक परिस्थितीचे प्रतिबिंब
-------------------------
उबैद आझम आझमी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेच्या वतीने जागतिक उर्दू दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘उर्दू शायरीचा परिचय’ या विषयावर मुंबईचे सुप्रसिद्ध कवी, शायर उबैद आझम आझमी यांचे ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर होते.
उबैद आझम आझमी यांनी उर्दू काव्याचा इतिहास, त्याचा विकासक्रम, विविध काव्यप्रवाह आणि महत्त्वाच्या कवींच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला. निवडक शेर, शायरीच्या उदाहरणांतून त्यांनी उर्दू कवितेतील वैचारिक खोली, कलात्मक सौंदर्य आणि अभिव्यक्तीचे वैविध्य स्पष्ट केले. कुठलीही कविता ही तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परिस्थितीचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात वाडेकर यांनी सांगितले की, कविता म्हणजे केवळ शब्दांची सुंदर मांडणी किंवा भावनांची अभिव्यक्ती नव्हे, तर ती मानवी अनुभव, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रभावी वाहक असते, असे सांगितले. शैक्षणिक समन्वयक डॉ. रशीद अशरफ खान यांनी प्रास्ताविक केले. शैक्षणिक समन्वयक डॉ. नूरजहाँ शेख यांनी परिचय करून दिला. शैक्षणिक समन्वयक डॉ. रिझवाना सय्यद यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.