नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी : प्रा.हिरालाल नरवाडे

CD
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी : प्रा. हिरालाल नरवाडे सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ९ : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, पिके वाचविण्यासाठी खते, कीटकनाशके, फवारणी, मजुरी, सिंचन तसेच अन्य कृषी निविष्ठांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रा. हिरालाल नरवाडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पीकविमा, नमो शेतकरी, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीसह दुष्काळ निधी तातडीने खात्यावर वर्ग करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजनेतील प्रलंबित अनुदान व मदत तातडीने वितरित करावी. पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि दुष्काळ निधीची रक्कम त्वरित खात्यांवर वर्ग करावी, वस्तुनिष्ठ सरसकट पंचनामे करावेत, खते, बियाणे, कीटकनाशके व अन्य कृषी निविष्ठांवर आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे, सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच पिण्याच्या पाण्यासोबत चारा व पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कर्जपुनर्गठनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रा. नरवाडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; आंतरराष्ट्रीय कायदा अन् मानवाधिकारांसाठी मोठं काम

Gokul Milk Union Election : बंटी पाटलांना शिट्टी, तर महायुतीला कपबशी; गोकुळच्या रणधुमाळीला वेग, ५ हजार ३०० ठरावधारकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी धावपळ

Family Pension Rules: सुनेच्या पेन्शनमध्ये सासूला हिस्सा मिळतो का? नातवंडांकडून पैसे मागता येतात? हायकोर्टाने काय सांगितलं?

जसप्रीत बुमराह RCB मध्ये? MI च्या माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, तेव्हा IPL फ्रँचायझी म्हणाली, 'ये बुमराह-वुमराह क्या करेगा?'

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT