नाशिक

सफाई कर्मचार्यांना चांगली वागणूक द्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावा

CD
--- सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांचे निर्देश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. वारसाहक्काने मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या नियुक्त्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन तसेच अन्य प्रलंबित आर्थिक लाभांची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (नवी दिल्ली) सदस्य रवी रामू कलोसे यांनी गुरुवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली. महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, सेवा-सुविधा, आरोग्यविषयक बाबी, सामाजिक सुरक्षा, वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कलोसे यांनी आढाव्यातील मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि अखिल भारतीय सफाई मजदुर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट उपस्थित होते. कलोसे म्हणाले, की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रतिबंधक कायदा २०१३ च्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. २०१८ च्या सर्वेक्षणानुसार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत अपुरी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्थानिक सफाई कंत्राटांमध्ये २५ टक्के कर्मचारी मेहतर समाजातील असावेत, या नियमानुसार नियुक्त्या झाल्या आहेत की नाहीत, याची महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. चौकट मुदतीत नियुक्त्या न झाल्यास कारवाई सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत घोषणापत्र आणि पोलिस पडताळणीची प्रक्रिया नियुक्तीनंतर पूर्ण करावी. यासाठी समिती गठित केली असली, तरी पात्र कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या आत नियुक्ती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचा विभागीय आयुक्तांकडूनही आढावा घेण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत नियुक्त्या न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही कलोसे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT