Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : वि.का सोसायट्यांकडून जिल्हा बॅंकेस माहिती देण्यास टाळाटाळ?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने सुरू असलेल्या लिलाव प्रक्रीया विरोधात पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने झालेल्या बिऱ्हाड आंदोलनाची दखल घेत, पालकमंत्री भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदनिहाय ६ टक्के, ७ व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली खरी.

मात्र, ही माहिती देण्यास कार्यकारी सोसायटीकडून माहिती येण्यास उशीर होत आहे. यात सोसायट्यांना फटका बसणार असल्याने त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केलेली आहे. या विरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले.

तत्पूर्वी पालकमंत्री भुसे, माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयात थकबाकीदार सभासदांची बैठक झाली. बैठकीमध्ये थकबाकीदार सभासदांच्या कर्ज वसुलीसाठी व्याजाच्या संदर्भात चर्चा झाली.

त्या चर्चेच्या दरम्यान थकबाकीदार सभासदांना संस्था/बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दरम्यान व्याज सवलत मिळण्याची मागणी केली.

या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी माहिती मागविली. जिल्हा बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश देऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटला असला तरी, सोसायट्यांकडून माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

काही सोसायट्यांनी माहिती दिली मात्र, आम्हाला याचा इतका आर्थिक फटका बसणार असे देखील नमूद केले आहे. माहिती दिल्यास त्यावर निर्णय झाल्यास आपल्याला बसणाऱ्या आर्थिक नुकसानीचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने सोसायट्या संभ्रमात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT