Naik Education Institute Election  esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : खर्चात काटकसर, आर्थिक शिस्त आणली : पंढरीनाथ थोरे

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षांत अनावश्यक खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त निर्माण केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षांत अनावश्यक खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त निर्माण केली आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही कठोर निर्णय घेताना अनेक जण दुखावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (V. N. Naik Institution Election)

मात्र, संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असे निर्णय घ्यावे लागले. त्यातूनच संस्थेची आर्थिक बाजू भक्कम होऊन अनेक ठिकाणी प्रलंबित असलेली शैक्षणिक इमारतींची बांधकामे पूर्ण करता आली. तसेच, वाढीव बांधकामेही हाती घेणे शक्य झाले, असे क्रांतिवीर विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.

संस्थेची निवडणूक येत्या शनिवारी (ता. २७) असून, यासंदर्भात माहिती देताना थोरे म्हणाले, की संस्थेत पूर्वी सुरू असलेली बांधकामे पूर्ण करून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सिन्नर), माध्यमिक विद्यामंदिर (निन्हाळे, ता. सिन्नर), माध्यमिक विद्यामंदिर (तळवाडे, ता. निफाड), टी. एस. दिघोळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर (नायगाव, ता. सिन्नर), माध्यमिक विद्यामंदिर (मिरगाव, ता. सिन्नर).

माध्यमिक विद्यामंदिर (धुळवड, ता. सिन्नर), माध्यमिक विद्यामंदिर (सारोळेथडी, ता. निफाड), माध्यमिक विद्यामंदिर (जळगाव, ता. नांदगाव), माध्यमिक विद्यामंदिर (कन्ही, ता. नांदगाव), माध्यमिक विद्यामंदिर (लोहशिंगवे, ता. नांदगाव) आदी शाळांची बांधकामे पूर्ण केली. त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (वेहेळगाव, ता. नांदगाव), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (राजापूर, ता. येवला). (latest marathi news)

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (धारणगाव, ता. निफाड), माध्यमिक विद्यालय (गोंदेगाव, ता. निफाड), संत जनार्दनस्वामी माध्यमिक विद्यालय (हिंगणवेढे, ता. जि. नाशिक) आदी इमारतींचे वाढीव बांधकाम हाती घेऊन पूर्ण केले आहे. मखमलाबाद येथील प्रस्तावित इमारतीचे तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करून दोन मजल्यांचे बांधकाम सुरू केले.

संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने शेवटच्या टप्प्यात क्रांतिवीर विकास पॅनलच्या उमेदवारांकडून सभासदांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात येत आहे. सभासदांचा, पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे.

कमलेश बोडके, शिवाजी मानकर, एकनाथ दिघोळे, भास्कर सोनवणे, विलास आंधळे, बुधाजी पानसरे, विठोबा फडे, सुभाष कराड, उत्तम बोडके, प्रशांत आव्हाड, विलास आव्हाड, सुरेश घुगे, धोंडिराम आव्हाड, भगीरथ गिते, गोविंद नागरे, रामनाथ सानप, एकनाथ आव्हाड, रामनाथ बोडके, अमृतराव सांगळे, श्‍याम बोडके, साहेबराव ढाकणे, गोपीनाथ बोडके, रामभाऊ केदार, वाल्मीक बोडके, संजय सांगळे, राजाराम बुरकुल आणि महिला प्रतिनिधी छाया बुरकुल, मंगला गंभीरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT