नाशिक

रिक्‍तपदांमुळे कामाचा अतिरिक्‍त ताण

CD
महिला बालविकासच्‍या रिक्‍तपदांमुळे कामाचा अतिरिक्‍त ताण (उपशीर्षक) आकृतीबंधामुळे १६ कनिष्ठ सहाय्यक मूळ पदावर; पर्यवेक्षकांची पदेही अनेक वर्षांपासून रिक्‍त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागात रिक्‍त पदांमुळे कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्‍त ताण पडत असतो. यातच सुधारित आकृतिबंधामुळे आणखी मनुष्यबळ कमी झाले आहे. त्यामुळे विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचारी संख्या घटल्याने महिला व बालविकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. महिला व बालविकासाच्या योजनांचा विस्तार होत असताना दुसरीकडे प्रशासकीय आणि क्षेत्रीय स्तरावरील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. अगोदरच पदभरती होत नसताना सुधारित आकृतिबंधामुळे निर्माण झालेली मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे, रिक्त पदे भरणे आणि प्रकल्पस्तरावरील कामकाज सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांना सेवा देणे आणि कार्यालयीन कामे वेळेत पूर्ण करणे यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १८ प्रकल्पांवर प्रभारी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या १९ प्रकल्पांपैकी केवळ एका ठिकाणी नियमित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. तर उर्वरित १८ प्रकल्पांचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. प्रकल्प अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना विभागातील कर्मचारीसंख्येत आणखी घट झाल्याने प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढला आहे. पर्यवेक्षिकांचे पदेही आठ वर्षांपासून रिक्त बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये पर्यवेक्षिकांच्या रिक्त पदांचाही प्रश्न कायम आहे. अंगणवाडी केंद्रांतील कामकाजाची पाहणी, लाभार्थ्यांना सेवा मिळत असल्याची खात्री करणे आणि पोषणविषयक उपक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी पर्यवेक्षिकांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु गेल्‍या सात– आठ वर्षांपासून पर्यवेक्षक पदाची भरती झालेली नाही. जिल्‍ह्यात १५२ पैकी केवळ ६० पदेच भरलेली आहेत. या पदांतील रिक्तता आणि प्रशासकीय स्तरावरील मनुष्यबळाची घट यामुळे क्षेत्रीय कामकाजावर अतिरिक्त ताण पडत आहे. याशिवाय इतर कामांचा ताण देखील कर्मचार्यांवर आहे. इन्‍फो सुधारित आकृतिबंधाचा फटका शासकीय विभागांतील पदरचना आणि मनुष्यबळाचे नियोजन करण्यासाठी सुधारित आकृतिबंध लागू करण्यात आला आहे. त्‍यानुसार जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागात या बदलामुळे उपलब्ध कर्मचारीसंख्येत घट झाली आहे. वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि कनिष्ठ सहाय्यक अशा तीन संवर्गांतील साधारण २५ कर्मचाऱ्यांना मूळ पदावर पाठविण्यात आल्याने विभागातील प्रशासकीय कामकाजासाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी झाले आहे. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT