corona vaccination esakal
नाशिक

नाशिकमध्ये महापालिका लसीकरण केंद्रावर चक्क वशिलेबाजी!

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : शहरात तीन महिन्यांपासून सुरळीत सुरू असलेल्या लसीकरणाची (corona vaccination) घडी विस्कळित झाली आहे. लसीकरणासाठी टोकन पद्धत सुरू झाल्याने पहाटेपासून प्रामाणिकपणे रांगा लावून असलेल्यांना परत फिरावे लागते, तर नगरसेवकांसह समर्थकांना केवळ टोकण असल्यामुळे लस मिळत आहे. त्यामुळे तीन-तीन महिने होऊनही अनेक ज्येष्ठांना दुसऱ्या लससाठी रोज मनस्ताप सोसावा लागतो आहे. (Vaccination-at--Municipal-Vaccination-Center-nashik-marathi-news)

लसीकरणातील हस्तक्षेपाने सामान्यांना चकरा

आतापर्यंत वयोवृद्धांसाठी लसीकरण सुरू होते. आता १८ ते ४५ वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण चालू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. लसपुरवठा पूर्वीइतकाच असताना ज्येष्ठासोबत आता तरुणांची गर्दी वाढली. सहाजिकच लस घेण्यासाठी डोस कमी आणि घेणारे जास्त, अशी स्थिती झाली आहे. लोक पहाटेपासून लसीकरण केंद्रावर पाणी, नाश्ता बरोबर घेऊन येतात. काही केंद्रावर लसीकरणापूर्वी रॅपिड टेस्ट केली जाते व टोकन दिले जाते. नंतर लसीकरण केले जाते. महापालिका कर्मचारी त्यांचे कामकाज करतात, परंतु त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांची माणसे पाठवून कामात हस्तक्षेप करतात.

केंद्राचा अघोषित ताबाच

सामान्यांना नोंदणी करावी लागते, तर नगरसेवकांच्या आप्तेष्टांना मात्र विनानोंदणी लस मिळते. नंबर लावण्याची गरज पडत नाही. लोकप्रतिनिधींचा फोन आला की लगेच लस दिली जाते. असा मनमानी कारभार लसीकरण केंद्रावर पाहायला मिळतो. लोकप्रतिनिधींनी शासकीय लसीकरण केंद्राचा अघोषित ताबाच घेतल्याने पहाटेपासून लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीस नंबर जवळ आल्यावर लस संपल्या, उद्या या, परवा या, असे सांगितले जाते. नियम पाळून लस घेणाऱ्यांना हेलपाटे आणि नियम तोडून वशिल्याने येणाऱ्यांचे लसीकरण, अशी कारभार सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT