haj-yatra esakal
नाशिक

NMC Haj Yatra Vaccination : महापालिकेतर्फे हज यात्रेकरूंचे आजपासून लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

NMC Haj pilgrim Vaccination : हज यात्रेसाठी नाशिक शहरातून जाणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे लसीकरणाची विशेष सोय करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.२३) आणि बुधवारी (ता. २४) ला महापालिकेच्या झाकिर रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. (Vaccination of Haj pilgrims by NMC from today nashik news)

मुस्लिम समाजात मक्का आणि मदिना ही अतिशय पवित्र ठिकाणे मानली जातात. प्रत्येक नागरिकांची इच्छा असते की त्याने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी. नाशिक शहरातून दरवर्षी शेकडो मुस्लिम नागरिक हज यात्रेला जातात.

हज यात्रेपूर्वी त्यांना अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. यासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना हज यात्रेची परवानगी मिळते. यंदाही नाशिक शहरातून लोक हज यात्रेला जात आहेत.

हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे कोविड-१९ लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर अशा यात्रेकरूंना दोन प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहे. आरोग्य तपासणी करून मेंदूज्वराची व तोंडावाटे पोलिओची लस दिली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंना इन्फ्लूएंझा लस दिली जात आहे. ज्यांना गंभीर आजार आहे त्यांना ही लस दिली जात आहे. याशिवाय रक्तदाब, मधुमेह, फिटनेसची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जात आहे.

झाकिर हुसेन रुग्णालयात लसीकरण

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे विशेष लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. नाशिक शहरातील ज्या नागरिकांना हज यात्रेकरिता जायचे असेल त्यांनी मंगळवार (ता. २३) आणि बुधवार (ता. २४) दुपारी २ ते ५ यावेळेत डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे संपर्क साधून लसीकरण व वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी.

हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT