vaccine esakal
नाशिक

मुंबई- ठाण्याच्या धर्तीवर नाशिकसाठी लस खरेदी; ग्लोबल टेंडरनुसार प्रक्रिया

विक्रांत मते

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) उपलब्ध होत नसल्याने मुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकादेखील लस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. लसींसाठी स्वतंत्र निविदाप्रक्रिया न राबवता मुंबई व ठाणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडरनुसार (global tender) त्याच किमतीमध्ये खरेदी केली जाईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. ( Vaccine purchased for Nashik like mumbai thane )

आयुक्त जाधव : ग्लोबल टेंडरनुसार प्रक्रिया

१६ जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये लसीकरण सुरू झाले. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने आणि अनियमितता सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून लस कधी उपलब्ध होईल, याबाबत सांशकता आहे. मात्र लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार पाडण्यासाठी महापालिकेने मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तातडीने लस मिळत असेल तर विलंब न लावता मुंबई व ठाणे महापालिका यांनी ज्या दरांमध्ये लस विकत घेतली त्याच दरात महापालिकादेखील लस खरेदी करेल, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

गटनेत्यांची आज बैठक

महापालिकेच्या वतीने स्वतंत्ररीत्या लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी स्वखर्चाने लस खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व सर्वपक्षीय गटनेत्यांची मंगळवारी (ता. १८) दुपारी महापौरांच्या रामायण बंगला येथे बैठक होणार आहे.

फक्त तीन केंद्रांवर लसीकरण

लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी शहरातील फक्त तीन केंद्रांवर तेही ४५ वर्ष वयोगटांत पुढील व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. पंचवटी विभागातील इंदिरा गांधी हॉस्पिटल, सातपूर विभागातील ईएसआय हॉस्पिटल व नाशिक रोड विभागातील खोले मळा आरोग्य उपकेंद्रांवर लस दिली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT