नाशिक

अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

CD
NSK26H34197 : वैभव पवार ------- भुसावळ पालिकेच्या तरुण अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू ------- भरधाव कार झाडावर आदळली; बहिण गंभीर जखमी सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ३१ : येथील पालिकेच्या संकीर्ण विभागातील कार्यालय अधीक्षक वैभव प्रकाश पवार (वय ३५) यांचा शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. स्वतःच्या घराजवळच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या त्यांच्या बहिणीच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैभव पवार शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त आपल्या बहिणीसोबत पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच १९, ईपी ३२२२) प्रवास करीत होते. रात्री सुमारे एकच्या सुमारास त्यांच्या घराजवळून जात असताना, समोर आलेल्या एका मोठ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती, की या अपघातात कार चालवत असलेल्या वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने तातडीने मदतीसाठी कोणीही धावून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या बहिणीला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. मनमिळाऊ स्वभावाचा युवा अधिकारी हरपला वैभव पवार भुसावळ पालिकेत आपल्या कामाच्या जोरावर अल्पावधीतच एक कर्तृत्ववान युवा अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांशी समन्वय साधण्याची हातोटी व कामाप्रती असलेली निष्ठा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगारांशीही ते आपुलकीने वागत असत. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांनी सहकाऱ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. कर्तव्य बजावताना सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणाऱ्या या युवा अधिकाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्याने पालिका परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या ३५व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी जमीन प्रमोद बोरोले (वय २५, व्यवसाय नोकरी, रा. भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कर्तव्यनिष्ठ व मनमिळाऊ युवा अधिकारी वैभव पवार यांच्या अकाली निधनाने भुसावळ पालिकेने एक उमदा अधिकारी गमावला असून, त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT