नाशिक

धुळे टुडे अवतीभवती

CD
पान चार अवतीभवती -- 34553 वैशाली बडगुजर यांना पीएच.डी. पदवी प्रदान धुळे : येथील प्रा. वैशाली बडगुजर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून ‘फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च येथे त्यांचे संशोधन कार्य झाले असून, डॉ. प्रीतम एस. जैन यांनी त्यांना या संशोधनासाठी मार्गदर्शन केले. एम. फार्मसीत त्यांनी विशेष प्रावीण्यातून विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यांनी ‘ए टेक्स्टबुक ऑफ मॉडर्न फार्मास्युटिकल अ‍ॅनालिटिकल टेक्निक्स’ या पुस्तकाचे लेखन व प्रकाशन केले आहे. तसेच डॉ. सौ. बडगुजर यांनी स्तनांच्या कर्करोगाच्या निदानासाठी ‘मॅमोग्राफीच्या साहाय्याने स्तन कर्करोग शोधणारे उपकरण’ या विषयावर पेटंट दाखल केले आहे. -- 34552 रोहित मासुळे यांना पीएच. डी. प्रदान धुळे : येथील अभय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. रोहित बाबुलाल मासुळे यांनी जिल्ह्यातून वयाच्या २६ व्या वर्षी पीएच. डी. पदवी मिळविण्याचा बहुमान प्राप्त केला. ते चिंचवार (ता. धुळे) येथील पंचायत समितीचे माजी सदस्य तथा येथील अभय युवा कल्याण केंद्र संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक डॉ. बी. एम. पाटील यांचे सुपुत्र आहेत.प्रा. मासुळे यांनी मेरठ येथील मोनाड विद्यापीठातून ''दी फ्युचर ऑफ इंग्लिश लँग्वेज असेसमेंट : अडाप्टिंग टेस्टिंग मेथड्स फॉर ऑनलाइन लर्निंग एन्व्हायरमेंटस्'' या विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली. त्यांचा गोताणे (ता. धुळे) येथील गोरख पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार केला. - 34548 सुरेश थोरात सुरेश थोरात यांचा पुरस्काराने गौरव धुळे : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात यांना कोल्हापूर येथील एक नोव्हेंबरच्या सोहळ्यात लेखक डॉ. प्रकाश कदम यांच्या हस्ते ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड २०२६’ अंतर्गत प्रतिष्ठित आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग पाटील अध्यक्षस्थानी होते. उद्योजक डॉ. शांताराम कारंडे, गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी प्रा. डॉ. मारुती पाटील, गायिका अपूर्वा सोनार, बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष रेवैया हिरेमठ, आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे प्रमुख पाहुणे होते. श्री. थोरात यांना तीन राष्ट्रीय, सोळा राज्यस्तरीय आणि चाळीसहून अधिक जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

Video: जंगलाचा क्रूर कायदा! माकडाला उड्या मारण्याची शिक्षा, सिंहिणीने जिवंतच फाडलं...

Latest Marathi News Live Update : भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांची कमतरता

DIWALI DIYA LIGHTING TIPS AND TRICKS: दिवाळीत वाऱ्यामुळे पणत्या वारंवार विझतायत? दिवे तेवत ठेवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होतेय 'ही' ट्रिक!

Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

SCROLL FOR NEXT