Valentine day Week Enthusiasm in youth Celebrate gift different day sakal
नाशिक

‘व्हॅलेंटाइन वीक’चा तरुणाईत उत्‍साह

वेगवेगळे दिवस होताय साजरे; भेटवस्तूंची खरेदी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रेमाचा उत्‍सव असलेल्‍या व्हॅलेंटाइन डेला अवघे काही दिवस उरले आहेत. अशात व्हॅलेंटाइन सप्ताहाला जल्‍लोषात सुरवात झाली आहे. यानिमित्त तरुणांमध्ये उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. वेगवेगळे दिवस यानिमित्त साजरे केले जात आहेत. बाजारपेठेतही बहर आला असून, भेटवस्तूंची जोरदार खरेदी सुरू असल्‍याचे बघायला मिळते आहे. बुधवारी (ता. ९) चॉकलेट डे, तर गुरुवारी (ता. १०) टेडी डे साजरा केला जाणार आहे.

व्हॅलेंटाइन वीकला सोमवार (ता. ७) पासून सुरवात झाली आहे. प्रारंभी ‘रोज डे’ साजरा करण्यात आला. या दिवशी आपल्‍या प्रियजनांना गुलाबाचे फूल देत त्‍यांच्‍याविषयी प्रेमभाव व्‍यक्‍त करण्यात आला. मंगळवारी (ता. ८) प्रपोज डे होता. यादिवशी आपल्‍या मनातील भावना प्रकट करताना तरुणाईने नात्‍यातील ऋणानुबंध अधिक दृढ केले. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठ सजली आहे. भेटवस्तूंची खरेदी सध्या सुरू आहे. आपले मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसीसाठी भेटवस्तू खरेदी करण्याची लगबग सध्या बघायला मिळते आहे. त्यामुळे बाजारपेठेतही उत्‍साह निर्माण झाला आहे.

हॉटेलिंग, आउटिंगचे जोरदार नियोजन

सध्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त तरुणांकडून जोरदार नियोजन आखले जाते आहे. खुले पर्यटनस्‍थळे खुले झाल्‍याने आउटींग, तसेच हॉटेलिंगचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यामुळे हॉटेल व्‍यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. या दिवसासाठी विशेष सजावटीवर भर दिला जातो आहे.

''महाविद्यालये सुरू झाल्‍याने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याबाबत उत्‍सुकता वाढलेली आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवस ग्राहकांची वर्दळ कायम राहणार असल्‍याचा अंदाज आहे.''

- महेंद्र चौधरी, व्‍यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT