Vande Bharat Express  esakal
नाशिक

Vande Bharat Express: ‘वंदेभारत’ मुळे टॅक्सी, रिक्षांचा रोजगार वाढला! भाविकांची पर्यटनस्थळी वर्दळ

सकाळ वृत्तसेवा

Vande Bharat Express : मुंबईहून थेट नाशिकमार्गे शिर्डीला जाणारी व शिर्डीहून नाशिकला येणाऱ्या वंदेभारत ट्रेनमुळे टॅक्सी व रिक्षावाल्यांच्या रोजगारात वाढ झाली आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर व पंचवटी येथील पर्यटन वाढले आहे.

पर्यायाने रिक्षावाल्यांना उच्च प्रतीचे भाडे मिळत असून त्यांच्या रोजगारात वाढ झाल्याचे रिक्षावाल्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Vande Bharat express increased employment of taxis rickshaws Devotees flock to tourist spots nashik news)

वंदेभारत ट्रेन मुंबईहून सकाळी सहा वाजता निघते, तर नाशिकला नऊ वाजता पोचते. ही ट्रेन शिर्डीला अकरा वाजता पोचते. देवदर्शन झाल्यानंतर पुन्हा ही ट्रेन संध्याकाळी सात वाजता नाशिकला असते. ही ट्रेन संपूर्ण एसी असून उच्च सुविधांनी युक्त आहे.

मुंबईकर सकाळी या ट्रेनने निघून नाशिकला नऊ वाजता पोचतात. नाशिकला पंचवटी काळाराम मंदिर, सीता गुंफा त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे दर्शन करून पुन्हा संध्याकाळी सहा वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येतात.

यासाठी नाशिक रोड येथील टॅक्सी व रिक्षावाल्यांना सध्या या ट्रेनमुळे प्रवाशांची आवक वाढून चांगला रोजगार मिळत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना सहा तासात पंचवटी बरोबर त्र्यंबकेश्वरचे दर्शन घडत असल्यामुळे ही ट्रेन मुंबईकरांना सोयीची ठरत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पर्यायाने रिक्षावाल्यांना नाशिक शहरात चांगला रोजगार मिळत आहे. तर टॅक्सीवाल्यांना त्र्यंबकेश्वर- नाशिकचे भाडे चांगले मिळत आहे. नाशिकच्या पर्यटनात वाढ झाल्याने इतर रोजगारही वाढला आहे.

"सध्या ही ट्रेन सकाळी नऊ वाजता मुंबईहून नाशिकला येते. येथून प्रवासी पंचवटी, सीता गुंफा, काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथे जाणे पसंत करतात. दर्शन झाल्यावर पुन्हा साडेपाच ते सहाच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही ट्रेन पकडण्यासाठी येतात. त्यामुळे आम्हाला या पर्यटनातून चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय वेळ वाचवण्यासाठी पर्यटक स्पेशल रिक्षा करतात." - विनोद भदाणे रिक्षा चालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Marriage Pressure : लग्नासाठी मुली मिळेनात म्हणून आलं नैराश्य, मनातून खचला अन् तरुणाने थेट नदीत घेतली उडी...

अयोध्या ठरली युपीचे 'ग्रोथ इंजिन': योगी सरकारच्या धोरणांमुळे पर्यटन आणि व्यवसायात जबरदस्त वाढ

Latest Marathi News Live Update : जोगेश्वरी चाचा नगरमध्ये ५० वर्षीय इसम नाल्यात कोसळला, इसमाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश

'मी ऐश्वर्याला मुस्लिम बनवून तिच्यासोबत...' पाकिस्तानी मौलानीचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

Pune Accident : पुण्यात अपघाताची मालिका सुरुच! येरवड्यात नवले ब्रीज सारखाच अपघात; ७ गाड्या एकमेकांना धडकल्या...

SCROLL FOR NEXT