नाशिक

इमारत उभी, उद्घाटन रखडले; वरखेड्याचे आरोग्य प्रशासनाला दिसणार कधी?

CD
13298 वरखेडा ः आदिवासी उपयोजनेंतर्गत उभारण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत. वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात रुग्णांना जुन्या, धोकादायक इमारतीतूनच सेवा; ग्रामस्थांचा अपेक्षाभंग सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २७ : वरखेडा (ता. दिंडोरी) येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही ती अद्याप रुग्णसेवेत दाखल झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जुन्या, धोकादायक इमारतीतूनच सेवा घ्यावी व द्यावी लागत आहे. नवीन इमारत तयार होऊनही आरोग्यसेवा सुरू करण्यास विलंब लागत आहे. आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषदेने नवीन इमारत उभारली. या इमारतीमुळे सुसज्ज आरोग्य सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बांधकाम पूर्ण होऊनही इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू न झाल्याने शासनाच्या निधीतून उभारलेल्या सुविधेचा लाभ नागरिकांना मिळालेला नाही. जुन्या इमारतीची स्थिती धोकादायक असल्याचे सांगितले जात असताना तेथूनच रुग्णसेवा सुरू आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वरखेडा व परिसरातील ग्रामीण आणि आदिवासी वस्त्यांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. किरकोळ आजारांवरील उपचार, तपासण्या आणि औषधोपचारांसाठी नागरिक येथे येतात. नवीन इमारतीत सेवा सुरू झाल्यास रुग्णांना अधिक सुरक्षित वातावरणात उपचार मिळण्यास मदत होईल. नवीन इमारतीत आरोग्यसेवा सुरू करण्यासाठी कोणत्या प्रशासकीय प्रक्रिया प्रलंबित आहेत, उपकरणे व औषधसाठ्याची उपलब्धता आहे का, याबाबत आरोग्य विभागाने स्पष्टता द्यावी. तसेच इमारत रुग्णसेवेत दाखल करण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेपेक्षा नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने विलंब दूर करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ......................................

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT