yeola muncipal esakal
नाशिक

येवल्याच्या पालिकेत विविध पदे रिक्त; भुजबळांना साकडे

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : ‘ब’ वर्ग पालिका असूनही येथील पालिकेतील संगणक, विद्युत अभियंत्यांसह तब्बल १६ पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडत असल्याने ही पदे त्वरित भरावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन केली आहे. या मागणीची दखल घेत तातडीने ही पदे भरण्याच्या सूचना भुजबळांनी केल्या आहेत. (Various-posts-vacant-in-Yeola-nashik-marathi-news)

अपूर्ण अधिकाऱ्यांमुळे शहराचा विकास करताना अडचणींना सामोरे

शुक्रवारी (ता. २) ना. भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना संपर्क कार्यालयात त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. या वेळी उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. भुजबळ यांच्या प्रयत्नाने येवल्याच्या पाणीपुरवठा योजनेचा साठवण तलाव तुडुंब भरल्याबद्दल भुजबळांचा सत्कार करण्यात आला. पालिकेच्या मागील वर्षापासून बदली झालेल्या संगणक अभियंता, विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता व नगर परिषद जलदाय, अग्निशमन, रचनाकार विभागातील श्रेणी ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून एकूण १६ पदे अद्याप रिक्त आहेत. यामुळे इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या कामकाजाचा बोजा पडत आहे. अपूर्ण अधिकाऱ्यांमुळे शहराचा विकास करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विविध कामे रेंगाळत असल्याने आम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही रिक्त पदांबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत पदे त्वरित भरण्याची विनंती केली असून, त्यांनीही तातडीने सूचना दिल्या आहेत.

-दयानंद जावळे, गटनेते, येवला

काही पदांवर प्रभारी अधिकारी नेमलेले असून, त्यांच्याकडे येथील अतिरिक्त कारभार असल्याने मूळ ठिकाणाहून येथे येण्यास टाळाटाळ करतात. शेजारील ‘क’ वर्ग पालिकांना पूर्णवेळ अधिकारी आहेत. पण, आपली ‘ब’ वर्ग पालिका असताना मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे या वेळी पटणी यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सूरज पटणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रवीण बनकर, अपक्ष गटनेते रूपेश लोणारी, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, संतोष परदेशी, मलिक मेंबर, शफिक शेख, अमजद शेख, निसार लिंबूवाले, राजेंद्र लोणारी, सरोजिनी वखारे, छाया देसाई आदी नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT