नाशिक

माळमाथा विकासासाठी वासखेडीत बेमुदत अन्नत्याग उपोषण

CD
माळमाथा विकासासाठी वासखेडीत बेमुदत उपोषण रस्त्यांची दुरवस्था व प्रलंबित विकासकामांविरोधात आंदोलन सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. ५ : माळमाथा परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मूलभूत विकासकामे आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ वासखेडी येथे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. माळमाथा परिसरातील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती करावी, तसेच रखडलेल्या विकासकामांना गती देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते तथा वासखेडीचे माजी उपसरपंच दीपक जाधव आणि ॲड. युवराज तोरवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी दहा वाजता वासखेडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाली. माळमाथा परिसरातील प्रमुख तसेच ग्रामीण रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. दररोज या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. माळमाथा परिसरातील रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने देऊन तसेच विविध माध्यमातून पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी वासखेडीच्या सरपंच स्वाती सोनवणे, माजी जि. प. सदस्य नितीन सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक बी. पी. पाटील, वंचित बहुजन आघाडीचे आबासाहेब खैरनार, मुख्याध्यापिका के. एस. गायकवाड, सुनील मोहिते, निलेश तोरवणे, प्रहार संघटनेचे जयेश बावा, संजय पाटील, राहुल गवळे, नाना शेलार, राजू कोरडकर, तहानू कारंडे, संजय बहिरम, मोहन जाधव, मधुकर जाधव, विक्रम मुजगे, दिगंबर कुवर, भाईदास कुवर, रवींद्र कुवर, विलास जाधव, प्रतापराव मुजगे, रितेश मुजगे, सागर मुजगे, अविनाश देवरे, सुरेश सूर्यवंशी, जितेंद्र गांगुर्डे, रितेश बागुल, शामकांत मोजगे, बाळकृष्ण मुजघे, कमलेश कुवर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT