नाशिक

निष्ठावान संघसाधकास समाज मुकला

CD
निष्ठावान संघसाधकास समाज मुकला वासुदेव, वृंदा शिंगणे यांच्या शोकसभेतील सूर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : काही माणसांची निष्ठा हयातभर आपल्या विचारांशी असते. त्यांचे तन, मन आणि धनदेखील समाजहिताच्याच हिताचा अखंड विचार करीत होते. अशी निष्ठावान माणसे खऱ्या अर्थाने समाज समृद्ध करतात, असा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पूर्व प्रचारक आणि आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र व समाजसेवेसाठी समर्पित करणारे वासुदेव रामचंद्र शिंगणे तथा आबा आणि त्यांच्या पत्नी वृंदा वासुदेव शिंगणे या सेवाव्रती दाम्पत्याच्या शोकसभेटून उमटला. संघ परिवारातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि शिंगणे कुटुंबीयांतर्फे मोहिनीदेवी रुंगटा विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहीच्या आबांच्या जाण्याने राष्ट्रकार्यासाठी झटणारा एक निष्ठावान संघसाधक आणि चालता-बोलता इतिहास हरपल्याची तीव्र भावना सभेतून व्यक्त झाली. शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या आदर्श दाम्पत्याच्या स्मृतींना उजाळा दिला आणि आदरांजली अर्पण केली. या वेळी व्यासपीठावर आणि उपस्थित मान्यवरांमध्ये गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, शहर संघचालक डॉ. मालपाठक, भारतीय इतिहास संकलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश टेमघिरे, येवला येथील कार्यकर्ते रमाकांत भावसार, शास्त्रज्ञ आणि इतिहास संकलन समितीचे कार्यकर्ते ओमप्रकाश कुलकर्णी, विलास देवळे, वनवासी कल्याण आश्रमाचे नागेश काळे, भगूर शिक्षण मंडळाचे एकनाथ शेटे, पुरोहित संघांचे सतीश शुक्ल, जयराम शिंदे, केदार शिंगणे यासह अनेक मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महागमार्ग धाराशिवमध्ये रोखला! सोलापूरमध्ये राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; आता मोर्चा बारामतीकडे...

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : चंद्रपूर जिल्ह्यात बसला भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, कुरली गावाजवळ होता केंद्रबिंदू

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

SCROLL FOR NEXT