नाशिक

पत्नी पाठोपाठ दुसर्याच दिवशी पतीचे निधन

CD
फोटो : आबा शिंगणे H34915/वृंदा शिंगणे H34916 वासुदेव शिंगणे यांचे निधन पत्नीपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी पतीचे निधन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पूर्व प्रचारक आणि विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांचे आधारस्तंभ वासुदेव रामचंद्र शिंगणे तथा ‘आबा’ (वय ९२) यांचे मंगळवारी (ता. १०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अवघ्या एक दिवस आधीच त्यांच्या पत्नी वृंदा शिंगणे (वय ८२) यांचे निधन झाले. एकाच दिवसाच्या अंतराने शिंगणे दांपत्याने जगाचा निरोप घेतल्याने नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघ परिवारात शोककळा पसरली आहे. आबा शिंगणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनाने संघ परिवारातील एक चालता-बोलता इतिहास हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. इतिहास संकलन आणि क्रांतिस्मृती जपण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्व. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेतून १९९६ पासून त्यांनी नाशिक जिल्ह्यात ‘अखिल भारतीय इतिहास संकलन समितीचे’ कार्य सुरू केले आणि ''अनंत कान्हेरे स्मृती समिती''चे प्रमुख म्हणून काम पाहताना हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले. आबांच्या या सर्व प्रदीर्घ सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात त्यांच्या पत्नी दिवंगत वृंदा शिंगणे यांची त्यांना मोलाची साथ लाभली. २४ तासांच्या अंतराने या आदर्श दांपत्याने इहलोकीची यात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आबा व वृंदा शिंगणे यांच्या मागे मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT