Vat Purnima 2023 esakal
नाशिक

Vat Purnima 2023 : जन्मोजन्मीच्या सोबतीसाठी वडाला साकडे! शहर परिसरात वटपौर्णिमा अपूर्व उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

Vat Purnima 2023 : सात जन्मांसाठी हाच पती मिळावा आणि त्याला दीर्घायुष्य मिळावे, असे साकडे घालत महिलांनी वटसावित्री पौर्णिमेचे भक्तिभावाने पूजन केले. शहरातील विविध भागांत पूजेसाठी सकाळपासून महिलांनी गर्दी केली. (Vat Purnima 2023 city area celebrated with great excitement nashik news)

यानिमित्त अनेकींनी आवर्जून नेसलेली साडी, नाकात नथ आणि आभूषणांसोबतचे फोटो काढत मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केले. ज्यांना शक्य झाले नाही, अशा महिलांनी घरीच वडाची फांदी आणून पर्यावरणपूरक पूजनाचा आनंद घेत जन्मोजन्मी हाच पती मिळावा, म्हणून मनोभावे प्रार्थनाही केली.

वटसावित्री पूजनासाठी पंचवटीतील सीता गुंफा परिसर, कपालेश्वर मंदिर परिसर, रामकुंड परिसर, सिद्धेश्वर मंदिर परिसर, रविवार पेठ, सावरकरनगर परिसरासह शहराच्या सर्व उपनगरांत महिलांनी एकत्र येत पूजन केले. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांनी घरच्याघरीच वडाची फांदी लावत पूजन केले.

शनिवारी संपूर्ण दिवसभर महिलांची पूजनासाठी लगबग सुरूच असल्याचे दिसून आले. यानिमित्त आपापल्या मैत्रिणींसह फोटो काढत व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर शेअर करत आनंद साजरा केला. अनेकदा वटसावित्री पौर्णिमेला महिला नटून थटून पूजनासाठी येत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे याप्रसंगी चेन स्‍नॅचिंगचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेले आहेत. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शहरात गस्‍त वाढविली होती. तसेच महिलांनी दागिने सांभाळावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. त्यास प्रतिसाद देत काही महिलांनी सोन्याऐवजी इमिटेशन ज्वेलरी परिधान केल्याचेही दिसून आले.

पर्यावरणाचा ऱ्हास नकोच

वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक महिलांनी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा केली. मात्र, काहींनी वडाचे झाड लावून पूजन करण्यासाठी त्याच झाडाची फांदी तोडून पर्यावरणाचा ऱ्हास नको, असा सामाजिक संदेशही यानिमित्ताने दिला. काही महिलांनी सणाला सामाजिक वळण देत ठिकठिकाणी वडाची रोपे लावून त्यांचे पूजन केले.

सेल्फीसाठी लगबग

आवर्जून नेसलेली हिरवी भरजरी साडी, सोबत दागिन्यांचा शृंगार करत अनेक महिलांनी वडासोबत सेल्फी घेत ती नातलग, मैत्रिणींसह फेसबुक, व्हॉटसअप ग्रुपवर शेअरही केली. कडक उन्हापासून बचावासाठी काही सावित्रींनी चक्क गॉगलही परिधान करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला साकडेही घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT