नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर

CD
व्ही.बी.जी. रामजी योजनेंतर्गत ७२ हजार कामे --- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सज्जता; ‘मनरेगा’ची ४८ हजार अपूर्ण कामेही सुरू राहणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. व्ही.बी.जी. रामजी योजनेंतर्गत शेल्फवरील ७२ हजार कामे सुरू करण्यात येणार आहेत. या कामांमधून ९४ लाख मनुष्यदिवस रोजगारनिर्मितीची क्षमता उपलब्ध होईल. पूर्वीच्या ‘मनरेगा’ योजनेंतर्गत अपूर्ण असलेली ४८ हजार कामेही सुरू ठेवण्यात येणार आहेत. या कामांमधून ८६ लाख मनुष्यदिवस रोजगारनिर्मितीची क्षमता उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना, जलसंधारण, चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे. भविष्यातील कामांचे नियोजन करण्यासाठी युक्तधारा पोर्टलवर ८० हजार कामे अपलोड केली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार देण्यावर भर देण्यात येत आहे. मजुरांना कामाची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पडेस्क मजुरांना कामाची मागणी सहजपणे नोंदविता यावी, यासाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय स्तरावर हेल्पडेस्क सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचे दूरध्वनी क्रमांक आणि तालुका स्तरावरील संबंधित तहसील कार्यालयांचे संपर्क क्रमांक गावोगावी देण्यात येणार आहेत. मजुरांना या क्रमांकांवर संपर्क साधून कामाची मागणी नोंदविता येईल. दूरध्वनीद्वारे प्राप्त मागण्यांची नोंद घेऊन संबंधित यंत्रणांमार्फत रोजगार देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, तसेच रोहयो शाखेचे कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळेत कामाच्या मागणीची नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत. कामाची मागणी नोंदविण्यासाठी ०२५७-२२१७१९३ व ०२५७-२२२३१८० या क्रमांकांवर संपर्क साधावा. चौकट कामांसाठी मजुरांनी संपर्क साधावा दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देणे, जलसंधारणाच्या कामांना चालना देणे आणि भविष्यातील पाणी व चारा उपलब्धतेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे. मजुरांनी वरील संपर्क क्रमांकांद्वारे कामाची मागणी नोंदवून रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजूषा घाटगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT