Vedokt Controversy esakal
नाशिक

Vedokt Controversy : महंत सुधीरदास यांनी स्पष्टपणे माफी मागावी : करण गायकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संयोगिताराजे भोसले (Sanyogitaraje Bhosale) यांनी समाजमाध्यमातून श्रीकाळाराम मंदिरातील सांगितलेला प्रकार खरा असून, त्यात कुठलेही दुमत नाही. (vedokt controversy Karan Gaikar statement about Mahant Sudhir Das should apologize clearly nashik news)

परंतु मंदिरात उत्सव सुरू असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या आदेशानुसार स्वराज्य पक्षातर्फे कुठलेही आंदोलन केले जाणार नाही, असे स्पष्टीकरण स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ता करण गायकर यांनी शनिवारी (ता. १) पत्रकार परिषदेत केले.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत गायकर बोलत होते. ते म्हणाले, की संयोगिताराजे भोसले यांनी समाज माध्यमांमध्ये टाकलेली पोस्ट हा त्यांना आलेला अनुभव सादर केला आहे.

त्यांच्यासोबत अशा प्रकारचा अनुभव कुठल्या पुजारी किंवा महंतामुळे आला, त्या महंत सुधीरदास यांनी स्वतःहून माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिल्याने त्यांनीच हा प्रकार घडविला, हे स्पष्ट होते. महंत सुधीरदास यांनी मी असे कुठलेही वर्तन केलेले नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मात्र संयोगिताराजे यांच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांचे मन राखण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारात त्यांनी स्पष्ट माफी मागितली पाहिजे, अशी स्वराज्य पक्षाची मागणी आहे. त्यांनी कोल्हापूरला जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची जरूर भेट घ्यावी, असेही गायकर म्हणाले.

समाज बांधवांनी कोणीही त्या ठिकाणी येऊन स्वराज्य पक्षातर्फे आंदोलन करू नये, ही भूमिका आहे. सत्य परिस्थिती समोर मांडावी आणि त्यांनी त्या ठिकाणी माफी मागावी एवढीच आमची माफक अपेक्षा असल्याचे गायकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT