vegetable rate hike in weekly market nashik news esakal
नाशिक

Vegetable Rate Hike : आठवडे बाजारात सर्वच भाज्या खाताय भाव; कोथिंबीर, टोमॅटो, आल्याच्या दराने घेतली उसळी

सकाळ वृत्तसेवा

Vegetable Rate Hike : ग्रामीण भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक गेल्या काही दिवसांपासून थंडावली आहे. त्याचा परिणाम आठवडे बाजारावर झाला असून पालेभाज्यांपासून सर्वच प्रकारच्या भाज्या ‘भाव’ खाऊन गेल्या.

भाजीपाल्याची मंदावलेली आवक व त्यामुळे चढे भाव यामुळे अनेकांनी आठवडे बाजारातील मच्छीला पसंती दिली. (vegetable rate hike in weekly market nashik news)

पावसाच्या रिपरिपीने गत काही दिवसांपासून दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसह पेठ रोडवरील शरदचंद्र मार्केटमधील फळभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे आठवडे बाजारात टोमॅटो चक्क शंभर ते एकशेवीस रुपये किलो होते.

मेथी, कोथिंबिरीच्या जुडीनेही ‘पन्नाशी’ गाठल्याने गृहिणींचेही बजेटही कोलमडले. याशिवाय वांगी, सिमला मिरची, भेंडी, कारली साठ ते ऐंशी रुपये किलो होते. आल्याची आवक घटल्याने किलोभर आल्यासाठी दोनशे रुपये मोजावे लागत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेकांची मच्छीला पसंती

आठवडे बाजारात पालेभाज्यासह सर्वच भाज्यांची आवक घटल्याने विक्रेत्यांची संख्याही तुलनेत कमीच होती. त्यामुळे बाजार गंगाघाट, गणेशवाडीतील काही भाग एवढाच मर्यादित राहिला. भाजीपाल्याने दराने उसळी घेतल्याने अनेकांनी मच्छीला पसंती दिली.

यात वाम, पापलेटसह कोळंबीच्या दराने हजार रुपयांचा दर गाठल्याने अनेकांनी तुलनेत स्वस्त असलेल्या गोड्या पाण्यातील राऊ, कोंबडा, वाडा,कटला, ओले बोंबील यांना पसंती दिली.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी कमी केलेल्या दरांत भाजीपाल्याची विक्री करून घरी जाणे पसंत केले. त्यामुळे रात्री उशिरा अनेक गृहिणींनी कमी झालेल्या भावाची पर्वणी साधत भाजीपाल्याची खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT