Vaishnavi Durole esakal
नाशिक

SSC Result : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत वैष्णवीचे यश

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : भाजीपाला विक्री (Vegetable Vendor) करणारे आई- वडिलांची हलाखीच्या परिस्थिती यात मोठ्या जिद्दीने सामोरे जात पंचवटीतील शिवाजी चौकातील येथील रहिवासी विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) तब्बल ८६. ६६ टक्के गुण मिळविले आहे. विशेष म्हणजे अभ्यासाबरोबर आईला भाजीपाला विक्रीस व घरकामात मदत करून तिने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Vegetable Vendor girl Vaishnavi Durole Success Story SSC Exam Nashik News)

स्वामी विवेकानंद विद्यालयातील वैष्णवी विजय दुरोळे, असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. वडील विजय नारायण दुरोळे, आई सविता विजय दुरोळे, एक भाऊ विजय असे त्यांचे कुटुंब. वडील शिवाजी राठोड यांना योग्य तो कामधंदा नव्हता. सुरवातीला काही काळ वॉचमन म्हणून काम केले. त्यानंतर वडील शिवाजी व आई सविता यांनी भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला. घरात लहान असलेल्या वैष्णवी हिस शिक्षणाची मोठी आवड. स्वामी विवेकानंद विद्यालयात पाचवीपासून शैक्षणिक प्रवास सुरू झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव असल्याने आईस घरकामात व भाजीपाला विक्रीस मदत करीत अश्विनी अभ्यास करत होती. हलाखीच्या परिस्थितीत खचून न जाता तिने जोमाने व मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. शुक्रवारी (ता. १७) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तब्बल ८६. ६६ टक्के गुण मिळाल्याचे पाहून कष्टाचे चीज झाल्याची भावना तिच्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. यश संपादन करण्यास आई-वडिलांसह वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले होते.

शिक्षकांकडून पुरेपूर तयारी

कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू होते, परंतु विद्यालय सुरू होताच सर्व शिक्षकांनी आमची पुरेपूर तयारी करून घेतली. वर्गशिक्षक सचिन चांगटे , गणिताच्या विषय शिक्षिका संगीता पिंगळे व हिंदीचे शिक्षक किशोर झोटिंग पुरेपूर तयारी करून घेतली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला दळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, असे वैष्णवीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

Google Pixel 11 Series Launch: गुगलचे ४ नवे फोन भारतात लाँच! खरेदीवर १० हजार कॅशबॅक; पाहा किमती, फीचर्स अन् ऑफर्स...

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT