नाशिक

''रिल''चा नवा ट्रेण्ड

CD
धुळे : टुडे पान २ साठी...अँकर --- वाहनाच्या सरप्राईज गिफ्टसह ‘रिल’चा नवा ट्रेंड वितरणाचे बदललेले रूप; सेलिब्रेशनमुळे तरुणांच्या हाती नवा रोजगार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : गणपती, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या वर्षभरातील सर्वांत मोठ्या सण-उत्सवांचा काळ नुकताच पार पडला. या काळात मुहूर्तावर नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा मोठा कल दिसून आला. मात्र यंदा पारंपरिक वाहन खरेदीसोबतच आपल्या प्रियजनांना वाहने सरप्राईज भेट देण्यावर आणि या आनंदाच्या क्षणांचे आकर्षक ‘रिल’ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याच्या नव्या ट्रेंडची चर्चा अधिक झाल्याचे दिसून आले. दसरा आणि दिवाळीच्या मोठ्या मुहूर्तावर वाहनांची हमखास खरेदी होत असल्याने शोरूममध्ये आधीच गाड्यांचे बुकिंग पूर्ण झालेले असते. या पारंपरिक खरेदीसोबतच आता आपल्या प्रियजनांना वाढदिवस आणि विशेषप्रसंगी हक्काचे वाहन सरप्राईज भेट म्हणून देण्याची क्रेझ वाढली आहे. हा सुखद धक्का देण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यासाठी वाढदिवसाच्या तारखेपूर्वीच शोरूममध्ये जाऊन गाडीचे बुकिंग आणि सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. नंतर प्रत्यक्ष वाढदिवसाला शोरूममध्ये आणून किंवा थेट घरी वाहन पोहोचवून कुटुंबीयांना सुखद धक्का दिला जातो. वाहन ताब्यात देताना शोरूमतर्फेही खास तयारी केली जाते. वाहनासोबत फोटोसेशन, चावी सुपूर्द करताना वाजणारे म्युझिक, रंगीबेरंगी पताकांची उधळण आणि केक कापून हा क्षण अविस्मरणीय केला जातो. अचानक मिळालेल्या या अनोख्या भेटवस्तूमुळे घरातील वातावरणात आनंद आणि आश्चर्य निर्माण होते. सोशल मीडियाच्या या जमान्यात एआय तंत्रज्ञानाची भर पडल्याने या ट्रेंडला अधिकच चालना मिळाली असून, प्रत्येकजण आपला आनंद जगासमोर अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे. --- १४-१ चौकट ‘रिल मेकिंग’मधून रोजगाराची संधी पूर्वी शोरूममध्ये वाहन घेताना केवळ साधे फोटो काढले जात असत. परंतु आता या संपूर्ण प्रसंगाचे सिनेमॅटिक रिल बनवण्याला मोठी पसंती मिळत आहे. यासाठी स्वतंत्रपणे शुल्क देऊन व्यावसायिक ‘रिल स्टार’ किंवा व्हिडिओग्राफर्सना पाचारण केले जात आहे. ग्राहक शोरूममध्ये एन्ट्री करण्यापासून ते वाहनाची पूजा, चावी स्वीकारणे आणि नवीन वाहन चालवत शोरूममधून बाहेर पडेपर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षक चित्रण करून त्याचे रिल तयार केले जाते. सोशल मीडियावर या रिल्सला मिळणारी पसंती पाहता याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या वाढत्या मागणीमुळे डिजिटल क्षेत्रात तरुणांसाठी ‘रिल मेकिंग’च्या माध्यमातून एक नवा व्यवसाय आणि रोजगाराचे साधन उदयास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT