Smart City Latest Marathi News
Smart City Latest Marathi News esakal
नाशिक

वडापाव द्या; गाडी सोडवा : स्मार्ट रोडवरचा स्मार्ट उपक्रम

नरेश हाळणोर

नाशिक : शहरात दुचाकी पार्क केल्यानंतर ती जागेवर राहीलच, याची कोणतीही शाश्‍वती नसते. एकतर चोरट्यांनी लांबविलेली असते वा, वाहतूक पोलीस शाखेने उचलून नेलेली असते. त्याचा हकनाक त्रास मात्र दुचाकीमालकाला होतो.

मात्र, यावर अजब शक्कल वाहतूक पोलिस व टोईंग कर्मचाऱ्यांनी लढविली आहे. जर, तुमची दुचाकी एम.जी. रोड, स्मार्ट रोडवरील उचलून नेताना वाहतूक शाखेचा टेम्पो दिसला तर फक्त त्यांना हवे असलेले वडापाव घेऊन द्या, तुमची दुचाकी जागेवरच सोडली जाईल.

अर्थात पोलीस आयुक्तांनी जागेवर दंड भरून जागेवर वाहन ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले असले तरीही वाहतूक पोलीस शाखा व टोईंग कर्मचाऱ्यांची ही ‘अजब शक्कल’ म्हणजे स्मार्ट रोडवरचा ‘स्मार्ट’ उपक्रम समजला जात आहे. (Vehicle towing employees demand vadapav for release of bike parked at no parking zone in nashik smart City news)

एम.जी. रोड, स्मार्ट रोडवर नेहमीच नो-पार्किंगमधील वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक पोलीस शाखेकडून मात्र ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते त्या चारचाकी वाहनांविरोधात टोईंगची कारवाई न करता दुचाक्या वाहने उचलून नेण्यात धन्यता मानली जाते.

नो-पार्किंगमधील दुचाक्या वाहतूक शाखेच्या टेम्पोत ठेवल्यानंतर जागेवर जर वाहनमालक दंड भरून देण्यास तयार असले तर त्याचे वाहन जागेवर ताब्यात देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत. असे असतानाही बऱ्याचदा वाहतूक पोलीस जागेवर दंड न घेता दुचाकी मालकाला टोईंग शाखेत पाचारण केले जाते. त्यामुळे दुचाकीचालकाला हकनाक मनस्तापाला सामोरे जावे लागते.

दरम्यान, यावर वाहतूक पोलीस अन्‌ टोईंग कर्मचाऱ्यांनी अजब शक्कल लढवत ‘स्मार्ट’ उपाय म्हणजे ‘वडापाव द्या अन्‌, दुचाकी जागेवरच सोडवा’ असा आहे. अर्थात, दुचाकी वाहतूक शाखेने टेम्पोत जमा केली असेल तर, त्या टेम्पोत असलेल्या टोईंग कर्मचाऱ्याला हाताशी धरून दुचाकी मालकाने मेहेर सिग्नलजवळील ‘त्यांच्या’ ठराविक वडापाव विक्रेत्याकडून त्यांना पाहिजे असलेले वडापाव खरेदी करून त्याचे पैसे दिल्यानंतर लागलीच दुचाकी खाली उतरवून दिली जाते.

स्मार्ट रोडवरचा एक प्रसंग

शनिवारी (ता.३०) दुपारी एक वाजेच्या सुमारास एम.जी. रोडकडून वाहतूक पोलीस शाखेचा नो-पार्किंगमधील दुचाक्या उचलून नेणारा आयशर टेम्पो आला. या टेम्पोत एक मोपेड दुचाकी उचलून आणलेली होती. हा टेम्पो राणीभवन समोर थांबला. पाठीमागून एक महिला धावत-पळत आली. टोईंग कर्मचाऱ्याकडे मोपेड दुचाकी सोडण्याची विनंती केली असता, त्यांच्यात काही बोलणे झाले. टोईंग कर्मचाऱ्याने ही बाब पुढे बसलेल्या वाहतूक पोलिसास सांगितली. त्यानेही मूक संमती दिली. एक टोईंग कर्मचारी आणि ती महिला याच मार्गावर असलेल्या एका वडापाव दुकानात गेले. आठ-दहा वड्यांची ऑर्डर दिली. त्यानुसार, त्या वड्यांचे बिल त्या महिलेने ऑनलाईन दिले आणि इकडे टोईंग टेम्पोतून त्या महिलेची मोपेड दुचाकी खाली उतरवून देण्यात आली. अर्थात ‘तू भी खूश, मै भी खूश’ अशीच जर भूमिका असेल तर बेशिस्तांना कशी लागेल शिस्त...

शासकीय महसुलावर टाच

एकीकडे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या नावाखाली पोलीस आयुक्तालय टोईंगची कारवाईची भूमिका मांडते. तर दुसरीकडे वाहतूक पोलीस शाखाच बेशिस्तांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई न करता शासकीय महसुलावरच टाच आणते आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्याच आदेशाचे उल्लंघन करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT