Vehicles parked haphazardly in the court area of ​​Malegaon city. esakal
नाशिक

Nashik: मालेगाव कोर्टाच्या पायरीपर्यंत लागतात वाहने! खटल्यांसाठी येणाऱ्यांच्या वाहनांची व्हावी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील जिल्हा अप्पर सत्र न्यायालय परिसरात वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असताना कुठेही वाहन उभे केली जात आहेत. खटल्यासह इतर कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज इमारतीत प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे.

असे असताना पार्किंगची ऐशी की तैशी अशी अवस्था झाली आहे. पार्किंगच्या नियमांची पुरेपूर अंमलबजावणी होताना दिसत नाही.

कोर्टात येणाऱ्या नागरिकांसह काही जबाबदार व्यक्तीही आपली वाहने न्यायालयाच्या पायरीच्या समोरील बाजूस अस्ताव्यस्त उभी करतात. ही स्थिती दूर होऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनीही पुढाकार घेतला पाहिजे तरच ही स्थिती बदलू शकेल. (Vehicles take to steps of Malegaon Court Arrangements should be made for vehicles of those coming for cases Nashik)

जिल्हा व अपर सत्र न्यायालयात दिवसभर नागरिकांची गर्दी असते. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नियमित गुन्हेगारांना सुनावणीवेळी आणणे तसेच कौटुंबिक कलह, जमिनीचे वाद, पोलिस दप्तरी दाखल असलेल्या खटल्यांबाबत सुनावणीला हजर राहणे आदी कारणामुळे न्यायालय आवारात नियमित गर्दी असते.

जिल्हा होईल या दृष्टीने मालेगावात अप्पर जिल्हा दर्जाचे न्यायालय व इतर अनेक शासकीय कार्यालये गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन करण्यात आले आहेत. सर्वत्र जवळपास अशीच परिस्थिती असून वाढत्या गर्दी व वाहनांची पार्किंगबाबत ताळमेळ दिसून येत नाही.

शहरातील प्रांत व तहसील कार्यालयातही दरवेळी नवीन अधिकारी नियोजन करतात, मात्र नागरिकांची उदासीनता व नेहमीच्या पद्धतीने वाहने कुठेही उभे करण्याचा फंडा बदलत नसल्याने अनेकदा वाहतूक कोंडी झालेली दिसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नागरिकांची वाहने उभी करण्यासाठी तळमजल्यावर सुविधा करण्यात आलेली आहे. इमारतीच्या बाहेरील आवारात बाजूला दुचाकी पार्किंगसाठी जागा सोडण्यात आलेली आहे.

मात्र येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना वाहने कुठे उभी करावी, या संदर्भात सूचना देण्यास कुणीही नसल्यामुळे आपल्या दुचाकी थेट कोर्टाच्या पायरीपर्यन्त नेऊन उभी करतात. त्यामुळे न्यायालयाचा परिसर वाहनांनी गजबजलेला असतो.

"कोर्टासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांनी शिस्त न पाळता बेजबाबदारपणे वाहने पार्किंग करणे योग्य नाही. यामुळे शहराच्या नावाला कुठेतरी बाधा पोहोचत असते. या संदर्भात लवकरच लायन्सतर्फे फलक लावून शहरात जनजागृती करण्यात येईल."

- सम्यक लोढा, अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ मालेगाव साऊथ

"शहर बदलत असताना अनेक चांगल्या गोष्टी घडत आहे. मात्र नागरिकांना जुन्याच सवयींचा परिणाम अनेकदा वाहतूक व पार्किंग बाबतीत दिसून येतो. याबाबत पोलिस प्रशासनाने एकवेळ लक्ष घातले तर शिस्तबद्धता होईल." - ॲड. मंगेश हिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT