Vehicles vandalized again in Nashik Road area second incident in 24 hours  
नाशिक

Nashik Crime News : नाशिकात पुन्हा टवाळखोरांचा हैदोस सुरूच! २४ तासांत दुसऱ्यांदा वाहनांची तोडफोड; नागरिक हतबल

रोहित कणसे

नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून वाहनांची तोडफोडी होण्याच्या घटना घडत आहेत काल रात्री अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या जाळण्यात आल्यानंतर नाशिकरोड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा तोडफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देकील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

१२ जुलै रोजी सिडको भागात देखील १६ गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. त्यानंतर विहितगाव येथे देखील गाड्या फोडण्यात आल्या. यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक रोड परिसरात ४ ते ५ वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टवाळखोरांकडून दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकाराचा सोक्षमोक्ष लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT